मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवर नक्षलवाद्यांचा हल्ला; 2 जवान शहीद, एक जखमी

महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवर नक्षलवाद्यांचा हल्ला; 2 जवान शहीद, एक जखमी

maharashtra chattisgarh

maharashtra chattisgarh

गोंदिया, महाराष्ट्र सीमेवर असलेल्या चेक पोस्टवर ड्युटीवेळी अचानक जंगलातून आलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

गोंदिया, 20 फेब्रुवारी : छत्तीसगढच्या राजनांदगाव इथं पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. महाराष्ट्रातील गोंदियाला लागून असलेल्या सीमेवर झालेल्या या हल्ल्यात दोन जवान शहीद आणि एक जण जखमी झाला आहे. राजनांदगाव जिल्ह्याच्या बोरतलाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. गोंदिया, महाराष्ट्र सीमेवर असलेल्या चेक पोस्टवर ड्युटीवेळी अचानक जंगलातून आलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर एक जण जखमी झाला आहे. यातील जवानांची नावे समोर आली असून त्यांचे नाव राजेश हवलदार आणि ललित आरक्षक असे आहे. डीएसपी नक्षल ऑपरेशन अजित ओंगरे यांनी सांगितले की, सकाळी आठच्या सुमारास जवान सीमेवर ड्युटीसाठी तैनात होते.

हेही वाचा : औरंगाबादेत भीषण अपघात, काही कळायच्या आत भरधाव कार दुकानात शिरली अन्...

चेक पोस्टवर वाहनांचे चेकिंग सुरू होते. यावेळी अचानक नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी दुचाकींनासुद्धा आग लावली. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. सध्या नक्षलवाद्यांची संख्या किती होती आणि ते कुठून आले याचा तपास पोलिस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Maharashtra News, Naxal Attack