Home /News /maharashtra /

BREAKING: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, केलं खास आवाहन

BREAKING: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, केलं खास आवाहन

Dhananjay Munde Coronavirus Positive: याबाबत धनंजय मुंडे यांनीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

    मुंबई, 23 मार्च : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. काही महिन्यांपूर्वीही धनंजय मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तेव्हा योग्य उपचार घेत मुंडे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांना या व्हायरसची बाधा झाली आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. 'माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी,' असं आवाहन ट्विटरद्वारे धनंजय मुंडे यांनी केलं आहे. आदित्य यांच्यानंतर रश्मी ठाकरेंनाही झाली लागण दरम्यान, आतापर्यंत ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबामध्येही या व्हायरसची लागण झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दैनिक 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांची सोमवारी रात्री कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्या सध्या वर्षा निवास्थानीच होम क्वारन्टाइन झाल्या आहेत. मी डायबेटिक, ब्लड प्रेशर, हार्ट पेशंट रुग्ण आहे; मला कोरोना लस घेता येईल का? मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचीही कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा विळखा आता मुख्यमंत्र्यांच्या घरालाही पडल्याचं दिसत आहे.
    First published:

    Tags: Breaking News, Coronavirus, Dhananjay munde

    पुढील बातम्या