मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

NDRF च्या मोबदल्यापेक्षा दुप्पट भरपाई, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

NDRF च्या मोबदल्यापेक्षा दुप्पट भरपाई, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पहिल्यांदाच (Maharashtra Cabinet Meeting) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 10 ऑगस्ट : मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पहिल्यांदाच (Maharashtra Cabinet Meeting) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान होतं त्यासाठी पंचनामा झाले होते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकारने आतापर्यंत कधी एवढी भरपाई मिळाली नव्हती तेवढी, एनडीआरएफच्या मोबदल्यापेक्षा दुप्पट भरपाई देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बॅठकीत घेण्यात आला आहे, असं शिंदे म्हणाले. दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टपर्यंत केली आहे. शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला आहे. एनडीआरएफचे जेवढे पैसे मिळत होते त्याचे दुप्पट पैसे मिळतील. एनडीआरएफनुसार 6 हजार मिळायचे. पण आता दुप्पट मिळणार, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांनी आज मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे स्वागत केले. मेट्रो-3च्या वाढीव खर्चाला मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीनंतर फडणवीसांनी दिली नवी 'डेडलाईन'! यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी आपले मंत्रिमंडळ हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगून मंत्र्यांनी आपआपली जबाबदारी गांभिर्यपूर्वक पार पाडावी आणि महाराष्ट्राचा देशात नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
First published:

Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde

पुढील बातम्या