मुंबई 11 जून : राज्यातला बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. या विस्तारात शिवसेना आणि मित्रपक्षांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणं प्रतिनिधीत्व मिळेल असंही ते म्हणाले. लवकरच सगळ्यांना गोड बातमी मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्याच्या मंत्रिमंडळात काही जागा शिल्लक आहेत. गेल्या काही वर्षांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलं जात होतं. असं गाजर दाखवून असंतुष्टांना शांत ठेवण्याची ही राजकीय खेळी होती असंही बोललंय जातंय.
या मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश होतो का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच विजयसिंह मोहिते पाटील यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
Maharashtra Minister & BJP leader, Sudhir Mungantiwar: CM Devendra Fadnavis has decided that Maharashtra Cabinet expansion will be done before the upcoming Maharashtra Assembly Session, soon all will hear the good news. Shiv Sena & other allies will get as per their expectations. pic.twitter.com/bZzAdjRtEI
— ANI (@ANI) June 11, 2019
भाजपची साथ
या दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपची वाट धरली. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले.
त्याचरोबर विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
मंत्रिमंडळ विस्तारासोबतच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याचीही चर्चा आहे. रावसाहेब दानवे हे केंद्रात मंत्री झाल्यामुळे भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे.
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचा हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा आहे. लोकसभेमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपची विधानसभेची तयारी सुरू झाली आहे.