Home /News /maharashtra /

राज्यासह देशभरातील आजच्या टॉप 5 बातम्या वाचा एका क्लिकवर

राज्यासह देशभरातील आजच्या टॉप 5 बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai: Shiv Sena President Uddhav Thackeray with NCP chief Sharad Pawar after he was chosen as the nominee for Maharashtra chief minister's post by Shiv Sena-NCP-Congress alliance, during a meeting in Mumbai, Tuesday, Nov. 26, 2019. (PTI Photo) (PTI11_26_2019_000293B)

Mumbai: Shiv Sena President Uddhav Thackeray with NCP chief Sharad Pawar after he was chosen as the nominee for Maharashtra chief minister's post by Shiv Sena-NCP-Congress alliance, during a meeting in Mumbai, Tuesday, Nov. 26, 2019. (PTI Photo) (PTI11_26_2019_000293B)

राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा.

    मुंबई, 05 जानेवारी : महाविकासआघाडी सरकारचं खातेवाटप कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागलं आहे तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर आखाती देशांमध्ये तणाव आहे याच पार्श्वभूमीवर आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या. इराकची राजधानी बगदादमध्ये शनिवारी रात्री अमेरिकेच्या दुतावासासह अन्य काही ठिकाणांवर रॉकेट हल्ला करण्यात आला. गेल्या दोन दिवसांत अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांनतर ही घटना घडल्याने या मागे इराण असल्याचं म्हटलं जात आहे. कासिम सुलेमानी हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता आहे. सविस्तर बातमी वाचा-बगदादमध्ये अमेरिकन दुतावास आणि एअरबेसवर हल्ला, 5 जण जखमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपाचा निर्णय घेऊन यादी ही राज्यपाल यांच्याकडे पाठवली आहे, खातेवाटप निश्चित झालं असून लवकरच याची अधिकृत घोषणा होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिली. सविस्तर बातमी वाचा-खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे पाठवली, जयंत पाटलांनी केलं जाहीर भारतीय संघाचा कर्णधार (Indian Cricket Team) विराट कोहलीनं 5 जानेवारीला गुवाहटी येथे होणाऱ्या श्रीलंकाविरुद्ध टी-20 सामन्याआधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विराटनं पहिल्यांदाच नागरिकत्व सुधारणा कायदावर (Citizenship Amendment Act) भाष्य केले. सविस्तर बातमी वाचा-CAAवर पहिल्यांदाच बोलला कॅप्टन कोहली, सामन्याआधी केले मोठे वक्तव्य भारताकडून 15 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर भारतीय जलद गोलंदाजानं आज निवृत्ती जाहीर केली. भारताचा वेगवान गोलंदाज इरफान पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. शनिवारी स्टार स्पोर्ट्स स्टुडिओमध्ये त्याने आपल्या 15 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला निरोप दिला. असे असले तरी इरफान फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार आहे. सविस्तर बातमी वाचा-भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या गोलंदाजानं घेतली निवृत्ती! डिजिटल पेमेंटच्या (Digtial Payment)जमान्यात वेगवेगळे पेमेंट गेट वे वापरताना पुरेशी काळजी घेतली नाही, तर केवढं मोठं नुकसान होतं हे ठाण्यातल्या एका व्यक्तीच्या उदाहरणावरून पुन्हा एकदा उमजेल. या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याची जाणीवच या व्यक्तीला उशीरा झाली. ठाणे पोलिसांनी राजेंद्र शर्मा नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सविस्तर बातमी वाचा-Paytm, Google Pay करताना ठाण्यातल्या व्यक्तीला हातोहात फसवलं; 1 लाखाचा गंडा
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Donald Trump, Jayant patil, Maharashtra cabinet expansion, Uddhav tahckeray

    पुढील बातम्या