राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, राजभवनाच्या गार्डनवर शपथविधी होणार

राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, राजभवनाच्या गार्डनवर शपथविधी होणार

ज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार उद्या रविवारी सकाळी 11 वाजता होण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जून- राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार उद्या रविवारी सकाळी 11 वाजता होण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच आरपीआयतर्फे अविनाश महातेकर शपथ घेणार आहेत. राजभवनमधील वरिष्ठ सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शपथविधी सोहळा होणार आहे. राजभवनाच्या गार्डनवर शपथविधी होणार असून यासाठी मंडप टाकण्याच्या काम सुरू आहे. 250-300 लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यासाठी तयारी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने शपथविधी सोहळा यासाठी मंडप आणि आसनव्यव्सथा काम सुरू केले. राजभवनाच्या दरबार हाॅलच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने गार्डनवर हा शपथविधी होणार आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या सात जागा रिक्त आहेत. आता या जागांवर कोणत्या कोणत्या नेत्याची वर्णी लागते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत चर्चा रंगली आहे. पुढील आठवड्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा आहे.

अधिवेशनात विरोधक–सत्ताधारी आमनेसामने

पावसाळी अधिवेशनात सत्ताधारीविरूद्ध विरोधक असा सामना रंगणार आहे. प्रकाश मेहता प्रकरणामध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केलेली असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरील इनामी जमीन हडपल्याची आरोपामुळे विरोधक काहीसे मागे पडल्याचे चित्र पाहायाला मिळत आहे. विरोध पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विरोधकांना हा मोठा धक्का आहे. ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आता शिवसेना–भाजप युतीने विधानसभेसाठी देखील रणनीती आखली आहे.

विधानसभेसाठी 50-50 टक्के फॉर्म्युला

विधानसभेसाठी शिवसेना-भाजपने 50-50 टक्के फॉर्म्युला ठरवला आहे. पण, केंद्रात मिळालेल्या केवळ एक मंत्रिपदानंतर शिवसेना नाराज आहे. शिवाय, मित्रपक्षांना देखील लोकसभेसाठी शिवसेना-भाजप युतीने जागा दिल्याने मित्रपक्ष देखील असमाधानी आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मित्रपक्षांना काय मिळणार हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीचे आव्हान फत्ते करण्यासाठी मुंबई आणि दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता मुंबईत हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री अतिंम योजना तयार करत आहेत. याच संदर्भात चर्चा करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत सुजय विखेही होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विखे यांच्यासोबत काँग्रेसमधले त्यांचे काही समर्थक आमदारही भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना कसं सामवून घ्यायचे, पुढती रणनीती काय असेल अशा सगळ्या मुद्यांची या बैठकीत चर्चा झाली अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि संकटमोचक गिरीश महाजन हेही सहभागी झाले होते.

फडणवीस मोदी चर्चा

मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या सात जागा रिक्त आहेत. त्याचे नेमके काय करायचे यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत तीन पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून आमदार संजय कुटे आणि अतुल सावे यांना संधी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

या तीन पर्यायांवर झाली चर्चा

1) नव्यांना संधी देत मंत्रिमंडळाच्या रिक्त जागा भरणे.

2) मंत्रिमंडळ फक्त फेरबदल करणे.

3) आणि जैसे थे स्थिती कायम ठेवणे.

SPECIAL REPORT: लोकसभेनंतर उद्धव ठाकरेंचं आधी सरकार फिर 'राम मंदिर'

First published: June 15, 2019, 12:55 PM IST

ताज्या बातम्या