मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाविकासआघाडीची मोठी बातमी, शनिवारी कुठल्याही क्षणी होणार खातेवाटप!

महाविकासआघाडीची मोठी बातमी, शनिवारी कुठल्याही क्षणी होणार खातेवाटप!

Mumbai: Shiv Sena President Uddhav Thackeray greets his supporters after swearing-in as the Chief Minister of Maharashtra, at Shivaji Park in Mumbai, Thursday, Nov. 28, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad) (PTI11_28_2019_000182B)

Mumbai: Shiv Sena President Uddhav Thackeray greets his supporters after swearing-in as the Chief Minister of Maharashtra, at Shivaji Park in Mumbai, Thursday, Nov. 28, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad) (PTI11_28_2019_000182B)

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खातं कायम राहणार आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 03 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या खातेवाटपावरून चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

उद्या शनिवारी कुठल्याही क्षणी खातेवाटप जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवास्थानी सिल्वर ओकवर महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हजर होते. या बैठकीत कोणते खाते कुणाकडे राहणार यावर अंतिम निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे नेते

बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खातं कायम राहणार आहे. तर नितीन राऊत यांना ऊर्जा खातं तर अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खातं मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या खातेवाटपाचा घोळ गेल्या चार दिवसांपासून सुरूच आहे. काँग्रेसने ताणून धरल्याने हे खातेवाटप रखडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काँग्रेसला त्यांच्या वाट्याल्या आलेल्या खात्यांमध्ये बदल पाहिजे असून शिवसेना किंवा राष्ट्रावादीकडे असलेल्या खात्यांपैकी दोन महत्त्वाची खाती पाहिजे आहेत. जवळपास सर्व खातेवाटप पूर्ण झालं असा दावा काँग्रेसचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गुरूवारी केला होता. मात्र अद्यापही खातेवाटप जाहीर झालेलं नाही. खातेवाटप रखडलेलं असतानाच पालकमंत्रिपदाबाबात मात्र फॉर्म्युला ठरला अशी माहिती सूत्रांनी दिलीय. या नावांची थोड्याच वेळात घोषणा होण्याची शक्यता आहे.

पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला 14-12-10 हा असण्याची शक्यता आहे. शिवसेना 14, राष्ट्रवादी 12, काँग्रेसचे 10 अशी वाटणी करण्यात आलीय. आमदारांच्या संख्याबळानुसार पालकमंत्री प्रत्येक पक्षाला मिळणार आहेत. पालकमंत्री पदावरूनही वाद होते मात्र ते मिटविण्यात आले आहेत. स्थानिक प्रश्न सोडविण्यात पालमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्या आपल्याला मिळावा अशी तीनही पक्षांची चढाओढ होती.

असं असेल पालकमंत्र्यांचं संभाव्य खातेवाटप

नगर - बाळासाहेब थोरात

ठाणे - एकनाथ शिंदे

पुणे - अजित पवार

नांदेड - अशोक चव्हाण

बुलढाणा - राजेंद्र शिंगणे

जालना - राजेश टोपे

चंद्रपूर - विजय वेदट्टीवर

लातूर - अमित देशमुख

रत्नागिरी -उदय सामंत

धुळे - दादा भुसे

यवतमाळ - संजय राठोड

जळगाव - गुलाबराव पाटील

नंदुरबार - के सी पाडावी

औरंगाबाद - संदीपन भुमरे

सिंधुदुर्ग - अनिल परब

अमरावती - यशोमती ठाकूर

मुंबई शहर - आदित्य ठाकरे

मुंबई उपनागर -अस्लम शेख

बीड - धनंजय मुंडे

सांगली - जयंत पाटील

नागपूर - नितीन राऊत

नाशिक - छगन भुजबळ

रायगड - सुभाष देसाई/ अदिती तटकरे

सातारा - बाळासाहेब पाटील

कोल्हापूर - हसन मुश्रीफ

दरम्यान, खातेवाटपाबाबत गुरुवारी तिन्ही पक्षांची मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी, 'आमचे छोटे प्रश्न हे संपले असून मुख्यमंत्र्यांकडे यादी दिली आहे', असा खुलासा केला.  'काँग्रेसकडून सर्व बाबींवर चर्चा झाली आहे. सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली. काही खाते आणि पालकमंत्री यावरून थोडा वाद होता, पण सुटलेला आहे. आता आम्ही आमचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. यावर कधी निर्णय घ्यायचा ते मुख्यमंत्री जाहीर करतील,' असं या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं होतं.

बाळासाहेब थोरात यांनीही, 'महाविकासआघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. काही नाराज होते, त्यांची नाराजी दूर झाली आहे. शुक्रवारी खातेवाटपाबद्दल निर्णय जाहीर होईल, असं स्पष्ट केलं होतं.

First published:

Tags: Ajit pawar, Congress, Maharashtra cabinet expansion, Maharashtra CM, Shiv sena