मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

39 दिवसांनी शपथविधी, 120 तासांनी विस्तार, या 6 गोष्टींनी वाढवलं शिंदे-फडणवीसांचं टेन्शन!

39 दिवसांनी शपथविधी, 120 तासांनी विस्तार, या 6 गोष्टींनी वाढवलं शिंदे-फडणवीसांचं टेन्शन!

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपही करण्यात आलं आहे. या खातेवाटपानंतर शिंदे गटातले मंत्री नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आमदारांची नाराजी दूर करणं शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासाठी आव्हान असणार आहे.

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपही करण्यात आलं आहे. या खातेवाटपानंतर शिंदे गटातले मंत्री नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आमदारांची नाराजी दूर करणं शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासाठी आव्हान असणार आहे.

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपही करण्यात आलं आहे. या खातेवाटपानंतर शिंदे गटातले मंत्री नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आमदारांची नाराजी दूर करणं शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासाठी आव्हान असणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 14 ऑगस्ट : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर शिंदे आणि फडणवीस यांनीच 38 दिवस राज्याचा कारभार चालवला, ज्यावरून दोघांवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. 39 दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्टला महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये शिंदेंच्या 9 आणि भाजपच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर 5 दिवसांनी 14 ऑगस्टला शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खात्याचं वाटप करण्यात आलं, पण या खातेवाटपानंतर शिंदेंकडचे 5 आमदार नाराज आहेत. दादा भुसे, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय राठोड आणि संदिपान भुमरे हे पाच मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दादा भुसे यांना बंदरे व खनिकर्म, गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता, दिपक केसरकर यांना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा, संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन तर संदिपान भुमरे यांना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन ही खाती देण्यात आली आहेत. महाविकासआघाडी सरकारमध्ये दादा भुसे यांना कृषी खातं देण्यात आलं होतं, पण यावेळी त्यांना कमी महत्त्वाचं खातं मिळालं आहे. तर गुलाबराव पाटील आणि संदिपान भुमरे यांच्याकडे मागच्याच सरकारमधली खाती कायम आहेत. केसरकर यांना आदित्य ठाकरेंनी सांभाळलेलं पर्यटन खातं मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आणि अपक्ष असे मिळून 50 आमदार आले, पण या आमदारांची नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी टेन्शन वाढवणारी ठरू शकते. मंत्र्यांची नाराजी दूर कशी करणार? पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडच्या काही आमदारांची नाराजी समोर आली आहे, या आमदारांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान शिंदेंपुढे असणार आहे. आमदारांमध्येही नाराजी? एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आतापर्यंत 20 जणांचा शपथविधी झाला आहे. शपथविधीमध्ये संधी न मिळाल्यामुळे संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आमदारांमधली नाराजांची संख्या वाढत गेली, तर हे शिंदे आणि फडणवीस यांच्यासाठी भविष्यात अडचणीचं ठरेल. शिंदेंकडे काठावरचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार आहेत. पक्षांतरबंदी कायद्यापासून बचावासाठी शिंदेंकडे 36 आमदार असणं गरजेचं आहे, त्यामुळे 4-5 आमदार इकडचे तिकडे गेले तर एकनाथ शिंदेंची खूर्ची गोत्यात येईल. कमी महत्त्वाची खाती 2014 आणि 2019 ला सत्तेत असूनही कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे शिवसेनेचे नेते आणि आमदार नाराज होते. महाविकासआघाडी सरकारमध्ये तर गृह आणि अर्थ ही दोन्ही खाती राष्ट्रवादीकडे होती. आता हीच खाती भाजपकडे आली आहेत, त्यामुळे बंड करून पुन्हा मोठी खाती मित्रपक्षांकडे जाणार असतील तर काय फायदा? असा प्रश्न शिंदेंच्या आमदारांना पडला तर त्याची समाधानकारक उत्तर देण्याचं आव्हान मुख्यमंत्र्यांपुढे असेल. मनावरच्या दगडाचा त्रास देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद द्यायचा निर्णय मनावर दगड ठेवून केल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील अडचणीत आले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आमदारही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. भाजपकडे असणाऱ्या 106 आमदारांची नाराजी थोपवण्याचं कामही फडणवीस यांना करावं लागणार आहे. तारेवरची कसरत एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आतापर्यंत फक्त 20 जणांचाच शपथविधी झाला आहे. सध्यातरी या 20 जणांमध्येच सर्व खात्यांचं वाटप झालं आहे. पण पुढचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे, या विस्तारामध्येही आमदारांची नाराजी थोपवण्यासाठी शिंदे आणि फडणवीस यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
First published:

Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde

पुढील बातम्या