राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार, शिवसेनेच्या 13 आमदारांना शपथविधिसाठी फोन

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार, शिवसेनेच्या 13 आमदारांना शपथविधिसाठी फोन

शिवसेनेच्या मंत्र्यांची नावं अजूनही गुलदस्त्यात. मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार?

  • Share this:

मुंबई, 30 डिसेंबर: महिन्याभराच्या खलबतांनंतर सोमवारी दुपारी 1 वाजता आज राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. विधानभवनाच्या प्रांगणात राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज महाविकास आघाडीतील एकूण 36 मंत्री शपथ घेणार आहे. या कार्यक्रमासाठी साडेचार हजार आसन क्षमतेची व्यवस्था करण्यात आली आहे. तर 2 हजार पेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच आठ एलईडी स्क्रीन्सही लावण्यात आल्यात.

आज होणाऱ्या राज्य मंत्री मंडळ विस्तारामध्ये, शिवसेनेच्या आमदारांना मंत्री म्हणून शपथविधी घेण्याचे आदेश स्वत: शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून दिल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी नेमका कोणत्या मंत्र्यांना फोन गेला याबाबतची माहिती मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

नाशिक दोऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांनी रात्री आपल्या आमदारांना फोन करून सोमवारी मंत्री म्हणून शपथविधी घेण्याचे आदेश दिले आहे. रविवारपर्यंत शिवसेनेकडून मंत्री म्हणून कोण कोण शपथ घेणार याबद्दलची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. शिवसेनेचे अनेक आमदार मंत्री होण्यासाठी इच्छुक असल्याने पक्ष प्रमुखांच्या निरोपाची वाट पहात होते. अखेर रात्री स्वत: उद्धव ठाकरे यांनीच प्रत्येक आमदारांशी थेट बोलून मंत्री पदाची शपथ घेण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे अधिकृत निरोप आलेल्या इच्छुक आमदारांचा जीव भांड्यात पडला. तर ज्यांना अधिकृत निरोप आलेला नाही अशा इच्छुक आमदारांची धाकधूक मात्र वाढली आहे.

हेही वाचा-शिवसेनेकडून सोनिया गांधींवर स्तुतीसुमने, अजित पवारांबद्दलही भाष्य

दुसरीकडे उपमुख्यमंत्रिपदाची धुरा कोणाकडे जाते याबाबतही उत्सुकता आहे. अजित पवारांना कोणतं खातं मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये खातेवाटप झाले होते. यामध्ये गृह खाते सध्या तरी शिवसेनेकडे आहे पण ते राष्ट्रवादीकडे देण्यात येणार आहे. तर काँग्रेसकडं महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि समाजकल्याण खाती आहेत. कमी आमदार असतानाही काँग्रेसला चांगली खाती देण्यात आली आहेत.

काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी बड्या नेत्यांच्या हालचाली सुरू आहेत. दोन माजी मुख्यमंत्री मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यायचं झालं तर काँग्रेसला महत्वाची खाती हवी आहेत. यासाठीच काँग्रेसकडून उद्योग खात्याची मागणी केली जात होती. त्यामुळे आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार आणि कोणाला डावललं जाणार याकडे यासोबतच कोणती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. विशेष म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चाही रंगत आहे.

हेही वाचा-मराठी-कानडी वाद चिघळला, कोल्हापुरात शिवसैनिकांना बंद पाडली कन्नड मुव्ही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2019 06:58 AM IST

ताज्या बातम्या