मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपकडे गृह खातं, शिंदे गटातल्या नव्या चेहऱ्यांना संधी, मंत्रिमंडळ विस्ताराची मोठी अपडेट

भाजपकडे गृह खातं, शिंदे गटातल्या नव्या चेहऱ्यांना संधी, मंत्रिमंडळ विस्ताराची मोठी अपडेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जवळपास चर्चा पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जवळपास चर्चा पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जवळपास चर्चा पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 2 ऑगस्ट : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जवळपास चर्चा पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत टप्प्याटप्प्याने काही माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे येत्या 5 ऑगस्टला हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी 'न्यूज 18 लोकमत'ला दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकडे कोणती खाती असणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपला गृह विभाग हवं आहे आणि ते खातं भाजपकडेच जाण्याची दाट शक्यता आहे. राज्यात अडीच वर्षांपूर्वी युतीचं सरकार होतं. त्यावेळी गृह खातं हे भाजपकडेच होतं. विशेष म्हणजे ते खातं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याचकडे ठेवलं होतं. राज्यातील सुरक्षा यंत्रणेशी संबंधित हे खातं महत्त्वाचं आहे. त्यामुळे भाजपला हे खातं हवं आहे. भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिल्याने गृहखातं हे भाजपकडेच जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटातल्या नव्या चेहऱ्यांना संधी विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारातील नव्या चेहऱ्यांना पाहून काहींना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद भूषवणाऱ्या शिवसेना नेत्यांना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेता येणार नाही. त्यांना wait and watch या भूमिकेवर ठेवलं जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा दोन टप्प्यात विस्तार होणार आहे. त्यापैकी पहिला विस्तार हा 5 ऑगस्टला होणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 ते 16 मंत्री शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या शपथविधीच्या कार्यक्रमाला थेट केंद्रातील भाजप नेते येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा  60-40 असा फॉर्म्युला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला 15 ते 16 मंत्र्यांचा शपविधी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजप गृह खातं स्वत:कडे ठेवणार आहे. 60-40 असा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे. या विस्तारात शिवसेनेतील शिंदे गटाच्या अनेक माजी मंत्र्यांना वेट अॅड वॉचवर ठेवणार. मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. या शपथविधीला केंद्रातून भाजप नेते येण्याची शक्यता आहे. (देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अजित पवारांची 'ती' इच्छा पूर्ण! 2019 ची अशी केली परतफेड) दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबद्दल उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत महाराष्ट्राच्या राजकारणाचं पुढचं भवितव्य ठरणार आहे. कारण एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात कोर्टाने निकाल दिला तर राज्यात कदाचित मध्यावधी निवडणुका देखील लागू शकतात. कारण तशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. या सुनावणीनंतर दोन दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन होवून एक महिना होत आला तरी नवं सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे या सत्तानाट्याकडे संपूर्ण राज्यभरातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे. आता या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन हे ऑगस्ट महिन्यात भरवण्यात येणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधी मंडळाचं अधिवेशन घेण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
First published:

पुढील बातम्या