Home /News /maharashtra /

आंदोलक ते मंत्री, पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना धडा शिकवणाऱ्या बच्चू कडूंचा प्रवास

आंदोलक ते मंत्री, पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना धडा शिकवणाऱ्या बच्चू कडूंचा प्रवास

नववीत शिकत असताना त्यांनी वर्गमित्रांसोबत पहिल्यांदा आंदोलन केलं होतं.

    नागपूर, 02 जानेवारी : बच्चू कडू राज्याच्या राजकारणातील एक झंझावती नाव. बच्चू कडू यांची यंदा  मंत्रिपद वर्णी लागली. मात्र मंत्रिपद त्यांना सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. बच्चू कडू... महाराष्ट्रातल्या राजकारणातील एक झंझावती नाव...आक्रमक आंदोलन करणारा नेता अशीही बच्चू कडूंची ओळख. दिव्यांगांचा मुद्दा घेऊन त्यांनी राज्यभरात आक्रमक आंदोलन केली. प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आणि दिव्यांगाचे प्रश्न लावून धरले. दिव्यांगांच्या प्रश्नासाठी तर त्यांनी अनेक अधिकाऱ्यांना मारहाण केली.  तर अनेक अधिकाऱ्यांना शेतकरी आणि दिव्यांगाच्या प्रश्नाची दखल घेण्यास भाग पाडलं. एकीकडे त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलनं केलीय तर दुसरीकडे आमदार म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले. ओल्या दुष्काळामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळं शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी म्हणून बच्चू कडू यांनी मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेला. यावेळी पोलिसांनी बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र, तरीही बच्चू कडू यांचा आक्रमक बाणा कायम होता. सुरूवातीपासून बच्चू कडू यांनी भाजप सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदार संघातून त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. भाजपला विरोध असल्यानं बच्चू कडू  महाविकास आघाडीत सहभागी झालेत.  त्यांनी शिवसेनेला समर्थन दिलं. त्यामुळं शिवसेनेनं त्यांना  मंत्रिपद देऊन त्यांच्या शेतकरी आणि दिव्यांगाविषयीच्या कार्याची दखल घेतली. मंत्रिपद मिळवल्यानंतर बच्चू कडू पहिल्यांदाच नागपुरात दाखल झाले. यावेळी दिव्यांग आणि प्रहार संघटनेकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी मिळाल्यास आंनंद होणार असल्याचं मंत्री बच्चू कडू यांनी सांगितलंय. बच्चू कडू यांचा परिचय 5 जुलै 1970 साली बच्चू कडू यांचा बेलोरा गावात जन्म.. नववीत शिकत असताना त्यांनी वर्गमित्रांसोबत पहिल्यांदा आंदोलन केलं होतं. 1997 साली बच्चू कडू चांदुरबाजार पंचायत समितीचे अध्यक्ष झाले. 1999 साली विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2004च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला बळ मिळालं. आमदार झाल्यानंतरही बच्चू कडू यांनी आक्रमक आंदोलन सुरूच ठेवलंय. त्यामुळं बच्चू कडू लोकांना आपला माणूस वाटू लागले. दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत गेली. जनतेसाठी लढणाऱ्या नेत्यांला मंत्रिपद मिळाल्यानं सर्व स्तरातून त्यांचं स्वागत होते. आता बच्चू कडू यांच्या हातात सत्ता आहे. या सत्तेचा वापर ते सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी करतील यात शंका नाही.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Bacchu kadu, BJP, Maharashtra cabinet expansion, Maharashtra CM, Shiv sena

    पुढील बातम्या