शपथविधी सोहळ्याआधीच ठरलं! अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदाची धुरा

शपथविधी सोहळ्याआधीच ठरलं! अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदाची धुरा

शपथविधी सोहळ्याआधी ठाण्यात उपमुख्यमंत्रिपदाचे झळकले पोस्टर.

  • Share this:

मुंबई, 30 डिसेंबर: महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज दुपारी 1 वाजता विधानभवनाच्या प्रांगणात होणार आहे. या शपथविधी सोहळ्या आधीच ठाण्यामध्ये उप मुख्यमंत्रिपदी अजित पवार असे पोस्टर झळकले आहेत. काही दिवसांपासून अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपद जाणार असल्याची चर्चा होती. सोमवारी दुपारी 1 वाजता अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र अजित पवारांचे ठाण्यात झळकलेले पोस्टर पाहाता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची धुरा दिली जाणार का? असा सवालही उपस्थित होत आहे. असं खरंच झालं तर दुसऱ्यांदा अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. 23 नोव्हेंबर रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र बहुमत सिद्ध न झाल्यानं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडू शकते असं या ठाण्यातील पोस्टर्सवरून दिसत आहे.

अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपद गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटात अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी नकोत अशा धुसफूस सुरू आहे. या सगळ्या परिस्थितीत महाविकास आघाडी फुटू न देता आणि अंतर्गत कलह टाळून गुण्यागोविंदानं सर्वांची मन सांभाळून राज्याचा कारभार सांभाळण्याची मोठी अग्निपरीक्षा आहे.

हेही वाचा-उद्धव ठाकरेंनी फिरवली 'भाकरी', प्रस्थापितांना डावलले, 'या' लोकप्रतिनिधींना संधी

महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये खातेवाटप झाले होते. यामध्ये गृह खाते सध्या तरी शिवसेनेकडे आहे पण ते राष्ट्रवादीकडे देण्यात येणार आहे. तर काँग्रेसकडं महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि समाजकल्याण खाती आहेत. कमी आमदार असतानाही काँग्रेसला चांगली खाती देण्यात आली आहेत.

काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी बड्या नेत्यांच्या हालचाली सुरू आहेत. दोन माजी मुख्यमंत्री मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यायचं झालं तर काँग्रेसला महत्वाची खाती हवी आहेत. यासाठीच काँग्रेसकडून उद्योग खात्याची मागणी केली जात होती. त्यामुळे आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार आणि कोणाला डावललं जाणार याकडे यासोबतच कोणती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. विशेष म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चाही रंगत आहे.

हेही वाचा-मराठी-कानडी वाद चिघळला, कोल्हापुरात शिवसैनिकांना बंद पाडली कन्नड मुव्ही

Published by: Kranti Kanetkar
First published: December 30, 2019, 8:47 AM IST
Tags:

ताज्या बातम्या