Home /News /maharashtra /

'कोरोना'मुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार?, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

'कोरोना'मुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार?, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

सध्या तरी शाळा बंद करण्यासाठी कोणताही निर्णय झालेला नाही.

    मुंबई,11 मार्च: कोरोना व्हायरसने पुण्यापाठोपाठ आता मुंबईत एन्ट्री केली आहे. मुंबईत कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यात येणार आहे. 14 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप करण्याचा निर्णय घेण्यात येईल, यावरही मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच राज्यात कुठल्याही प्रकारचा मोठा समारंभ होणार नाही, असाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हेही वाचा..सावधान ! मास्कनंतर आता हँड सॅनिटायझरही बनावट, कारखान्यावर छापा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुंबईतील नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टरांची मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेतली. सध्या तरी शाळा बंद करण्यासाठी कोणताही निर्णय झालेला नाही. उलट शाळा बंद केल्या तर अधिक पॅनिक अवस्था होईल. त्यामुळे सध्यातरी शाळा कॉलेज बंद करण्यासारखी अवस्था नाही असं डॉक्टरांनी सांगितले. त्यात राज्यात पोहोचलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. तसेच आरोग्य विभागाकडून एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच आयपीएल संदर्भातही दोन भूमिका आहेत. एकतर सामने होतील. मात्र गॅलरी पासेस दिले जाणार नाहीत. घरी बसून थेट प्रक्षेपण पाहता येईल किंवा आयपीएलचे सामने पुढे ढकलण्यात यावा, अशा दोन भूमिका आहे. त्यावरती अद्याप निर्णय झालेला नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. हेही वाचा..कोरोनाची लस घ्या आणि लाखो रुपये घेऊन जा; व्हायरसविरोधी लसीच्या ह्युमन टेस्टसाठी शास्त्रज्ञांनी दिली ऑफर दरम्यान, महाराष्ट्रातही आता कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईतही आता कोरोना व्हायरसने दस्तक दिली आहे. मुंबईत कोरोना व्हायरसचे 2 नवे रुग्ण आढळले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात दोन्ही रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबईत 2 जणांना कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झाले आहे. दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आहेत. दुबईहून प्रवास करुन आलेले पुण्यातील 2 प्रवासी कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या ओला टॅक्सीने या रुग्णांनी मुंबई-पुणे प्रवास केला. टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे तीन निकटसहवासित देखील कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 झाली आहे. पुण्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे कोरोनाव्हायरसची कोणतीही लक्षणं दिसली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका, असं आवाहन आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. हेही वाचा..
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona virus, Corona virus india, Coronavirus, Coronavirus disease, Coronavirus symptoms, Maharashtra news

    पुढील बातम्या