मुंबई, 21 मार्च : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी होताना दिसत आहे. विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या आरोप आणि टीकांना सत्ताधाऱ्यांकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पण सभागृहामध्ये एकमेकांवर तोफ डागणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांचं वेगळच रूप पाहायला मिळालं.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शंभुराज देसाई, विरोधी पक्षनेते अजित पवार तसंच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर आमदार फोटो काढण्यासाठी उभे होते. फोटो काढत असताना अजित पवारांनी शंभुराज देसाई यांच्या मांडीवर बुक्की मारली.
अजितदादांच्या या बुक्कीनंतर शंभुराज देसाई थोडे मागे झाले, तसंच नंतर दोघंही हसायला लागले. फोटो काढून झाल्यानंतर सगळे नेते विधिमंडळाच्या कामकाजासाठी रवाना झाले. विधिमंडळातल्या सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या या मस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अजितदादांचा नादखुळा, शंभुराजेंना मारला मांडीवर बुक्का… pic.twitter.com/dBA31QD5Il
— sachin (@RamDhumalepatil) March 21, 2023
धुळ्याचे आमदार फारुक शाह हे त्यांच्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी पायऱ्यांवर बसून उपोषण करत होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार उपोषण मागे घेण्यासाठी आमदार फारुक शाह यांना मनवण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी हे फोटो सेशन करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar