मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

फडणवीसांचा सवाल, ठाकरे सरकारचा निर्णय, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार

फडणवीसांचा सवाल, ठाकरे सरकारचा निर्णय, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार

महाराष्ट्राचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन  (Maharashtra Budget Session 2022-23) हे नागपुरात (Nagpur) घेतलं जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Decision) आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्राचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2022-23) हे नागपुरात (Nagpur) घेतलं जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Decision) आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्राचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2022-23) हे नागपुरात (Nagpur) घेतलं जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Decision) आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई, 27 डिसेंबर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session 2021) आता दोन दिवस शिल्लक असताना पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत (Maharashtra Budget Session 2022-23) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपुरात (Nagpur) घेतलं जाणार आहे. हिवाळी अधिवेशन हे परंपरेनुसार नागपुरात न घेण्यात आल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारला विधानसभेत घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता सरकारने बजेट अधिवेशन हे नागपुरात घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे अधिवेशन 28 फेब्रुवारीला नागपुरात भरवलं जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Decision) याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारला या निर्णयाबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सूचित करावं लागेल. विधानभवनात राज्य मंत्रिमंडळाची 35 मिनिटांची बैठक पार पडली. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्य सरकारला प्रश्न विचारला होता. नागपूरला अधिवेशन होणार की नाही, आणि होईल तर ते कोणतं अधिवेशन होईल? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता. त्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं होतं. काही वेळातच कॅबिनेटची बैठक आहे. त्या बैठकीतच आम्ही ठरवू, असं अजित पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना, मुख्यमंत्री राज्यपालांना तिसऱ्यांदा पत्र पाठवणार

मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नसल्याची शक्यता

परंपरेनुसार प्रत्येक हिवाळी अधिवशन हे नागपुरात होतं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मुख्यमंत्री यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना काही दिवस विमान किंवा हेलिकॉप्टर प्रवास करता येणार नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन हे मुंबईत घेण्यात आलं. मुख्यमंत्री या अधिवेशनात सहभागी होणार होते. पण शनिवारी घेण्यात आलेल्या कोविड चाचण्यांमधून धक्कादायक माहिती समोर आली. विधानभवन परिसरात कार्यरत असलेले कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार मिळून अशा 25 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री या अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सत्ताधारी-विरोधक एकवटले, विधानसभेत ठराव मंजूर

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार?

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन झालेल्या शाब्दिक संघर्षामुळे वादळी ठरलं. विशेष म्हणजे या अधिनेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन मोठा गदारोळ बघायला मिळाला. राज्य सरकारने गुप्त मतदान पद्धतीने ही निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. तर भाजपने त्याला विरोध दर्शवत आवाजी मतदान पद्धतीने निवडणूक व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या निवडणुकीच्या कार्यक्रमावर हरकत घेतली. त्यांनी अद्यापतरी राज्य सरकारला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे 28 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. कदाचित ही निवडणूक आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतली जाण्याची शक्यता आहे.

First published: