Maharashtra budget session 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात जोरदार भाषण करत भाजपच्या नेत्यांना चांगलेच झोडपून काढले. भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर ठाकरी शैलीत टीकास्त्र सोडले.'सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण पाहून मला मी नटसम्राट पाहत असल्याचे भास झाला होता. मी एथोलो, हॅम्लेट असं काही बोलत असल्याचे वाटत होते. शेवट कुणी किंमत देतो का किंमत असं झालं आहे. तुमच्या भाषणाचा आवेश पाहून फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना भीती वाटायला लागली की आमचं काय होणार, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly session, Sudhir mungantiwar, Uddhav thacakrey