अजित पवारांच्या मदतीने बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडेंचा नवा मास्टरस्ट्रोक

अजित पवारांच्या मदतीने बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडेंचा नवा मास्टरस्ट्रोक

हा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजकीय मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.

  • Share this:

बीड, 9 मार्च : यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2021) बीड जिल्ह्यासाठी (Beed District) जिव्हाळ्याचे असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग आणि बीड जिल्ह्यातील आध्यात्मिक श्रद्धास्थाने यांना निधी देण्यात आला आहे. त्यामुळे हा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजकीय मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.

राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर, पुरुषोत्तम पुरी येथील पुरुषोत्तम मंदिर, श्रीक्षेत्र भगवानगड, श्रीक्षेत्र नारायणगड आणि श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याने बीडकरांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

या अर्थसंकल्पात नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम प्रगती पथावर असल्याचे सांगत लवकरच हा मार्ग पूर्ण होणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या विकासासाठी आर्थिक निधीची तरतूद केली जाईल, असं सांगत श्रीक्षेत्र भगवानगड, श्रीक्षेत्र नारायणगड आणि श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी मोठी आर्थिक तरतूद केल्याने या देवस्थानचा अधिक विकास होणार आहे.

हेही वाचा - अर्थसंकल्पावर उलट-सुलट प्रतिक्रिया येत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जोरदार बॅटिंग

बीड जिल्ह्याच्या राजकारणात सत्ता परिवर्तनाची केंद्र म्हणून या क्षेत्रांकडे पाहिले जाते. यातच मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांचा वर्ग जोडला गेला असल्यामुळे या आध्यात्मिक गडांच्या विकासाचा दुवा पकडत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आध्यात्मिक क्षेत्राला भरीव निधी मिळवून दिला आहे. तो धनंजय मुंडे यांच्या भविष्यकाळातील राजकारणाला पूरक ठरणार आहे.

बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या संदर्भात देखील गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळाला आर्थिक निधी देण्यासंदर्भात घोषणा केल्याने ऊसतोड मजुरांमधून देखील आनंद व्यक्त केला जात आहे. यातच स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळासाठी प्रत्येक साखर कारखान्यास एकूण गाळपावर प्रतिटन 10 रू. सेस लागणार, यातून जेवढी रक्कम जमा होईल तेवढीच रक्कम राज्य शासन देणार आहे. यामुळे बीड जिल्हावासीयांसाठी या वर्षीचा अर्थसंकल्प हा भरभरून देणारा ठरला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 9, 2021, 12:22 AM IST

ताज्या बातम्या