• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • राज्याचा अर्थसंकल्प फुटला का? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

राज्याचा अर्थसंकल्प फुटला का? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

Mumbai:Maharashtra CM Devendra Fadnavis along with Maharashtra finance minister Sudhir Mungantiwar during a pannel discussion held after announcing Maharashtra budget in Mumbai on Saturday. PTI Photo by Shashank Parade(PTI3_18_2017_000166B)

Mumbai:Maharashtra CM Devendra Fadnavis along with Maharashtra finance minister Sudhir Mungantiwar during a pannel discussion held after announcing Maharashtra budget in Mumbai on Saturday. PTI Photo by Shashank Parade(PTI3_18_2017_000166B)

' ट्विटरवर अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर काही क्षणात गोष्टी येताहेत. हे बदललेल्या तंत्रज्ञानाचा परिणाम आहे. विरोधीपक्षांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.'

 • Share this:
  मुंबई 18 जून :  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सरकारचा शेवटच अर्थसंक्लप सादर केला. शेतकरी आणि ग्रामीण भागाला झुकतं माप देणारा हा तुटीचा अर्थसंकल्प आहे. चार महिन्यात निवडणुका असल्याने सरकारचा हा अतिरिक्त अर्थसंकल्प होता. ग्रामीण भागासोबतच उद्योगाला उभारणी देण्याचा प्रयत्नही सरकारने केलाय. पण ठोस अशा उपायोजना यात नाहीत अशी टीका विरोधीपक्षांनी केलीय. अर्थसंकल्प सुरू असतानाच अजित पवारांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत अर्थसंकल्प फुटला असं सांगितलं. ट्विटरवर अर्थमंत्र्यांच्या बोलण्याआधीच अनेक गोष्टी येत असल्याचं पवार म्हणाले. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा आरोप फेटाळून लावला. त्यावर विरोधी पक्षांनी सभात्याग केला. काही वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत खुलासा केला. मुख्यमंत्री म्हणाले, अर्थसंकल्प फुटलेला नाही. विरोधकांचा गैरसमज झालाय. सध्या डिजिटलमाध्यमं अतिशय प्रगत झाली आहेत. ट्विटरवर अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर काही क्षणात गोष्टी येताहेत. हे बदललेल्या तंत्रज्ञानाचा परिणाम आहे. विरोधीपक्षांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ते सरकारवर टीका करण्यासाठी ट्विटरचा योग्य वापर करतात मात्र सरकारची बाजू लक्षात घेत नाहीत. अर्थसंकल्प महत्त्वाचा असून विरोधी पक्षांनी सभागृहात यावं असं आवाहनही त्यांनी केलं. या आहेत 10 मुख्य गोष्टी 1. राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर,  दुष्काळासाठी 6 हजार कोटी तर कृषी सिंचनासाठी 2,720 कोटींची तरतूद जलसंपदा खात्यासाठी 12,597 कोटी रुपये प्रस्तावित आहेत. मृद आणि जलसंधारण विभागासाठी 3,182 कोटी रुपये. 2. 2019-20 मध्ये 25,000 शेततळी करण्याचे उद्दिष्ट. सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी 350 कोटी. 3.  शेतकरी कुटुंबाला देखील कृषी अपघात विमा.  4 कृषी विद्यापीठासाठी 600 कोटींची तरतूद. गोपीनाथ मुंडे अपघात वीमा योजनेत सुधारणा 4. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प डिसेंबर 2021 पर्यत पूर्ण करण्याचे नियोजन. 5.  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची घोषणा. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती. 6. मान्सून कालावधीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता. महात्मा गांधी जयंतीनिमित्ती 150 कोटींचा निधी जाहीर 7. सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी 775 कोटी रुपयांची तरतूद 8. एसटी महामंडळ बसस्थानक साठी 136 कोटींची तरतूद 9. तीर्थक्षेत्रांसाठी नुतनीकरण 100 कोटींची तरतूद 10. जेजे आर्ट स्कूल परिसरसाठी 150 कोटींची तरतूद. आरोग्य योजनेसाठी 10,581 कोटी
  First published: