राज्याच्या अर्थसंकल्पातल्या 10 मुख्य गोष्टी

राज्याच्या अर्थसंकल्पातल्या 10 मुख्य गोष्टी

सभागृहात अर्थसंकल्प संपूर्ण सादर होण्याआधीच बाहेर उपलब्ध आहे असा आक्षेप अजित पवार यांनी घेतला. मात्र अध्यक्षांनी विरोधकांचा हरकतीचा मुद्दा फेटाळून लावला.

  • Share this:

मुंबई 18 जून :  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सरकारचा शेवटच अर्थसंक्लप सादर केला. शेतकरी आणि ग्रामीण भागाला झुकतं माप देणारा हा तुटीचा अर्थसंकल्प आहे. चार महिन्यात निवडणुका असल्याने सरकारचा हा अतिरिक्त अर्थसंकल्प होता. ग्रामीण भागासोबतच उद्योगाला उभारणी देण्याचा प्रयत्नही सरकारने केलाय. पण ठोस अशा उपायोजना यात नाहीत अशी टीका विरोधी पक्षांनी केलीय. सभागृहात अर्थसंकल्प संपूर्ण सादर होण्याआधीच बाहेर उपलब्ध आहे असा आक्षेप अजित पवार यांनी घेतला. मात्र अध्यक्षांनी विरोधकांचा हरकतीचा मुद्दा फेटाळून लावला. त्यावरून विरोधकांनी सभात्याग केला. त्यावर टीका करताना मुनगंटीवार म्हणाले, जे जे बाहेर जातायंत ते पुढील वेळच्या अर्थसंकल्पावेळी सभागृहात नसतील. आता यांना देव सुद्धा सुबुद्धी देऊ शकत नाही

या आहेत 10 मुख्य गोष्टी

1. राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर,  दुष्काळासाठी 6 हजार कोटी तर कृषी सिंचनासाठी 2,720 कोटींची तरतूद जलसंपदा खात्यासाठी 12,597 कोटी रुपये प्रस्तावित आहेत. मृद आणि जलसंधारण विभागासाठी 3,182 कोटी रुपये.

2. 2019-20 मध्ये 25,000 शेततळी करण्याचे उद्दिष्ट. सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी 350 कोटी.

3.  शेतकरी कुटुंबाला देखील कृषी अपघात विमा.  4 कृषी विद्यापीठासाठी 600 कोटींची तरतूद. गोपीनाथ मुंडे अपघात वीमा योजनेत सुधारणा

4. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प डिसेंबर 2021 पर्यत पूर्ण करण्याचे नियोजन.

5.  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची घोषणा. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती.

6. मान्सून कालावधीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता. महात्मा गांधी जयंतीनिमित्ती 150 कोटींचा निधी जाहीर,२ हजार ६१ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची यशस्वी उभारणी, उर्वरित मंडळांमध्ये काम प्रगतीपथावर.

7. सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी 775 कोटी रुपयांची तरतूद. श्रावणबाळ योजना 600 रुपये वरून 1000 रुपये वाढ.

8. एसटी महामंडळ बसस्थानक साठी 136 कोटींची तरतूद, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात  रु २१० कोटी

9. तीर्थक्षेत्रांसाठी नुतनीकरण 100 कोटींची तरतूद. विधवा , घटस्पोट महिलांना मदत स्वयंरोजगार योजना 200 कोटी  अनुदान

10. जेजे आर्ट स्कूल परिसरसाठी 150 कोटींची तरतूद. आरोग्य योजनेसाठी 10,581 कोटी. सामाजिक न्याय साठी 12 हजार कोटी ची तरतूद

Tags:
First Published: Jun 18, 2019 03:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading