Home /News /maharashtra /

BREAKING NEWS : महाराष्ट्रात दिवाळीनंतर सुरू होणार शाळा, शिक्षणमंत्र्यांनी सांगितला प्लान

BREAKING NEWS : महाराष्ट्रात दिवाळीनंतर सुरू होणार शाळा, शिक्षणमंत्र्यांनी सांगितला प्लान

राज्यात Coronavirus च्या नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आता शाळा कधी सुरू करणार यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी संकेत दिले आहेत.

    मुंबई, 29 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र असले तरी शाळा केव्हापासून सुरू होणार याबाबतची  माहिती समोर आली आहे. राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी पालक मुलांना शाळेत पाठविण्याबाबत सकारात्मक नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्या-टप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गांच्या शाळा सुरू करताना अधिक विचार करण्याची गरज आहे. दुसरीकडे त्यानंतरचे इतर वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू होतील. विषेश म्हणजे सरसकट शाळा सुरू करता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्याच्या आरोग्याच्यादृष्टीने हे आवश्यक आहे. राज्य सरकारने निर्धारित केलेल्या आरोग्य विषयक सर्व सुचनांचे व खबरदारीचे उपाय करूनच स्थानिक पातळीवर शैक्षणिक संस्थांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. हे ही वाचा-मुंबईत बसून अमेरिकन नागरिकांना घातला गंडा, बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश अकरावी प्रवेश केव्हा? अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लवकरच बैठक घेऊन विद्यार्थीहिताचा निर्णय घेतील, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. केंद्र सरकारने अनलॉक 5.० मध्ये म्हटले होते की, 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत निर्णय राज्य सरकार आपल्या राज्यातील परिस्थिती आणि तयारीनुसार घेईल.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या