BREAKING : ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; पुढच्या महिन्यात मतदान

BREAKING : ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; पुढच्या महिन्यात मतदान

राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर (ZP election) झाला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी पुढच्या महिन्यात मतदान होईल.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : महाराष्ट्रात गावा-खेड्यापासून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरुवात होणार आहे. राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापित झालेल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे.

23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होईल आणि 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

15 डिसेंबर तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील

23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी

31 डिसेंबर उमेदवारी  मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी

4 जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी

15 जानेवारी मतदान

18 जानेवारी मतमोजणी

एकतीस डिसेंबरला अर्जाची छाननी केली जाईल चार जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. निवडणूक चिन्ह तसंच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 4 जानेवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येईल आणि 15 जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होईल. 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: December 11, 2020, 4:07 PM IST

ताज्या बातम्या