सख्या भावानेच भावाला डोक्यात वार करून केला खून, पोळ्याच्या दिवशीच घटना
चाळीसगाव तालुक्यातील अभोने गावातील दोन सख्या भावाच्या वादात एका भावाने दुसऱ्या भावाच्या डोक्यात शस्राने वार करून संपवले. शिवाजी तुकाराम पाटील असे मयताचे नाव असून सदर खून पोळा सणाच्या दिवशी सख्या भावाने केला. गावात समजताच मेहुनबारे सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड घटनास्थळी धाव घेऊन मयताचा खुनाचा पंचनामा केला. खून करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.