Live updates : अखेर दोन तासांनी मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर, लोकल कसाऱ्याच्या दिशेला रवाना

मुंबई : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

 • News18 Lokmat
 • | September 17, 2022, 00:33 IST |  Maharashtra, India
  LAST UPDATED 3 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:47 (IST)

  गोरेगाव पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरण
  शिवसेना खासदार संजय राऊतांवर आरोपपत्र
  ईडीकडून पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल

  21:39 (IST)

  आमदार आहात, लोकोपयोगी कामं करा - आदित्य
  भाईगिरी करू नका, आदित्य ठाकरेंचा सज्जड दम
  'शिवसेना फोडली, पुढे महाराष्ट्राचे 5 तुकडे करतील'
  शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा सावधगिरीचा इशारा
  शिवसंवाद यात्रेला खेड-दापोलीत जोरदार प्रतिसाद
  स्वत:च्या फायद्यासाठी दिल्लीला गेलात - आदित्य ठाकरे
  आता महाराष्ट्रासाठी जा, मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला

  21:35 (IST)
  लम्पी आजार जनावरांपासून माणसांना होण्याची शक्यता अजिबात नसून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनानं मनुष्याला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही, जिल्ह्यातील पशुपालकांनी घाबरून जाऊ नये, जनावरांना लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास अथवा लक्षणं आढळल्यास तातडीनं जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी अथवा 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रूपाली सातपुते यांचं आवाहन
   
  21:35 (IST)

  नाशिकच्या हरिहर किल्ल्यावर 4-5 पर्यटक अडकले
  अंधारामुळे वाट चुकून निर्जनस्थळी पर्यटक अडकले
  पोलीस, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना
  चौघांनाही बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न

  21:28 (IST)

  - मध्य रेल्वे सेवा विस्कळीत

  - अप आणि डाऊन दोन्ही दिशेची वाहतूक विस्कळीत

  - डाऊन मार्गावर कसारा-आटगाव जवळ मालगाडीचे इंजिन फेल

  - तर अप मार्गावर आसनगाव स्थानकात मालगाडीचे कपलिंग तुटले

  - गेल्या एक तासापासून ८.०८ मी लोकल आसनगाव स्थानकात उभी

  20:50 (IST)

  पुलांना नाव दिल्यानं, पुतळे उभे केल्यानं समाजाची पाहिजे तशी फारशी प्रगती होत नाही, जे करतात त्यांना ते करू द्या, समाज घडवायचा असेल तर समाजात डॉक्टर, इंजिनीअर, सुशिक्षित विद्यार्थी घडवायला पाहिजे; नागपुरात प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात नितीन गडकरींनी व्यक्त केलं मत

  20:47 (IST)

  अजित पवारांना उत्तर देणार नाही - एकनाथ शिंदे
  'आम्ही काम करतोय, मी स्वत: कार्यक्रमाला आलोय'
  आदित्य ठाकरेंना सुरक्षा मिळाली होती - एकनाथ शिंदे
  तरीही चौकशी करायला सांगितलं आहे - मुख्यमंत्री

  19:56 (IST)

  मुक्तिसंग्राम लढ्यातील शहिदांना आदरांजली
  मराठवाड्याचा बॅकलॉग भरून काढू - मुख्यमंत्री
  'मराठवाड्याचा पाणी प्रश्नही सोडवण्याचा प्रयत्न'
  मराठवाडा ही संघर्षाची भूमी - एकनाथ शिंदे
  'सरकार चालवण्यासाठी वैयक्तिक अजेंडा नाही'
  'जनतेसाठीच निर्णय घेत आहे आणि घेत राहणार'

  19:43 (IST)

  जॉन्सन अॅंड जॉन्सन कंपनीचा परवाना रद्द
  बेबी पावडर उत्पादनाचा परवाना रद्द
  अन्न आणि प्रशासन विभागाची मोठी कारवाई
  चिमुकल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरमध्ये दोष
  नियमानुसार बनवली जात नव्हती बेबी पावडर
  कोलकाता प्रयोगशाळेचा अहवाल आल्यावर रद्द

  19:35 (IST)

  राष्ट्रवादीची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
  कार्यकारिणीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल
  मुख्य जनरल सेक्रेटरीपदी सुनील तटकरे
  महाराष्ट्रातून राष्ट्रीय कार्यकारिणीवर अजित पवार
  छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे

  मुंबई : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा