SSC आणि HSC च्या निकालासंदर्भात मोठी बातमी; कधी लागणार Result?

SSC आणि HSC च्या निकालासंदर्भात मोठी बातमी; कधी लागणार Result?

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 10 जुलै : महाराष्ट्र स्टेट बोर्ड (MSBSHSE) यांनी निकालाच्या तारखांबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आणली आहे. 10 वी आणि 12 वी चा निकालाची तारीख शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केली आहे. महाराष्ट्र HSC 2020 चा निकाल 15 जुलै पर्यंत जाहीर करण्यात येणार असून SSC 2020 चा निकाल जुलै महिन्याच्या अखेरपर्यत जाहीर करण्यात येणार आहे. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

10 वी आणि 12 वी चा 2020 चा निकाल महाराष्ट्र बोर्डातर्फे mahresult.nic.in. या ऑनलाईन संकेतस्थळावर पाहता येईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाच्या (एमएसबीएसएचएसई) बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या 13 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अजून लांबली आहे, कारण निकाल कधी जाहीर होईल याची अधिकृत पुष्टी नाही. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, असे म्हटले जात आहे की बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होईल.

7 मार्चपासून सुरू झालेली परीक्षा एप्रिलमध्ये संपणार होती, मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यावर ही परीक्षा मध्येच थांबविण्यात आली. राज्य सरकारने अशा वातावरणात परीक्षा घेणे अशक्य असल्याचे सांगितले म्हणून परीक्षा नंतर रद्द करण्यात आल्या.

हे वाचा-CBSE बोर्डाच्या परीक्षांची बातमी Fake; 11 जुलै रोजी लागणार नाही निकाल

एका विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात किमान दहा टक्के गुण मिळवावे लागणार आहे. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होतात, त्यांची मूळ गुणपत्रके देखील जारी केली जातात. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रक संबंधित शाळांकडून घ्यावी लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेस हजेरी लावली आहे ते विद्यार्थी वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in वर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतात.

 

 

 

 

Published by: Meenal Gangurde
First published: July 10, 2020, 5:17 PM IST

ताज्या बातम्या