मुंबई, 27 मे : महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दिनांक 28 मे) लागणार आहे. दुपारी 1 वाजता हा HSC result जाहीर होईल आणि तो विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येईल. HSC बोर्डाच्या mahresult.nic.in या वेबसाईटवर दुपारी 1 वाजल्यानंतर निकाल पाहू शकाल. याशिवाय News18 Lokmat च्या वेबसाईटवरही निकाल पाहता येईल.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात घेतली होती. त्याचा निकाल 28 तारखेला जाहीर होणार आहे.
कसा बघायचा ऑनलाईन निकाल
बोर्डाच्या वेबसाईटशिवाय News18 Lokmat च्या वेबसाईटवरही अधिकृतपणे पाहता येईल. दुपारी 1 वाजता आमच्या वेबसाईटवर निकालाची लिंक खुली होईल.
विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रवेशपत्रावर म्हणजेच अॅडमिट कार्डवर असलेला त्यांचा रोल नंबर किंवा परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर हा निकाल पाहता येणार आहे. याशिवाय दिलेल्या फॉरमॅटमध्ये जन्मतारीखसुद्धा टाकावी लागणार आहे. हे दोन्ही रकाने भरल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळेल.
VIDEO : दहावी-बारावीनंतर पुढे काय? कसं निवडाल करिअर? सांगत आहेत अविनाश धर्माधिकारी (भाग - १ )
वेगळ्या क्षेत्रांत कसं मिळवाल यश ? सांगत आहेत अविनाश धर्माधिकारी (भाग - 2)
VIDEO करिअर मंत्र : जीवनात यशस्वी कसं व्हाल ? सांगत आहेत अविनाश धर्माधिकारी (भाग - 3)
महाराष्ट्र बोर्डाच्या सर्व विभागांनी घेतलेल्या परीक्षेचे निकाल या एकाच ठिकाणी पाहायची सोय आहे. बरोबर दुपारी एक वाजता आमच्या वेबसाईटवर निकालाची लिंक ओपन होईल. त्यावर क्लिक केल्यावर निकाल कळेल.