मुंबई, 25 मे : भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून संघटनात्मक पातळीवर सर्व पदाधिकाऱ्यांची फेरनियुक्ती केली जाणार आहे. तर राज्यातील ७० टक्के जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत.
राज्य कार्यकारिणीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सर्व जिल्हा समन्वयकांना पक्ष विस्तारासाठी काम करण्याचे आदेश दिलेत. प्रदेश कार्यालयात यासंदर्भात महत्त्वाची बैठक बोलाण्यात आली होती. या बैठकीत पक्ष वाढीसाठी कसं काम करायचं याच्या सूचना देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
नितीन गडकरी धमकी प्रकरण, तपासासाठी NIAचे पथक नागपुरात
जिल्हाध्यक्ष बदलत असताना भाजप तरुण पदाधिकाऱ्यांना जिल्हा स्तरावर संधी देणार आहे. तसंच जुन्या जिल्हाध्यक्षांच्या अनुभवानुसार लोकसभा निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती होणार आहे. २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हालचाली केल्या जात आहेत. जिल्ह्याध्यक्ष बदलानंतर जुन्या जिल्हाध्यक्षांकडे लोकसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी दिली जाणार आहे.
नव्याने होणाऱ्या नेमणुकांमध्ये तालुकाध्यक्ष आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असेल. याशिवाय भाजपकडून जिल्हानिहाय संघटनात्मक दृष्टीने पक्षांतर्गत पालकमंत्र्यांची घोषणा केली जाईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 288 मतदारसंघात नव्या नियुक्ती दिसणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP