राज्यात 72 हजार पदांसाठी मेगा भरतीची प्रक्रिया सुरू, ही आहे सरकारची योजना!

राज्यात 72 हजार पदांसाठी मेगा भरतीची प्रक्रिया सुरू, ही आहे सरकारची योजना!

  • Share this:

मुंबई , 04 डिसेंबर : मराठा आरक्षणासाठी स्थगित करण्यात आलेली मेगा भरती आता पुन्हा सुरू होणार आहे. 72 हजार पदांसाठी ही भरती होणार आहे. पुढच्या आढवड्यात त्याची जाहीरात प्रसिद्ध होणार आहे. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परिक्षा होईल. प्रत्येक विभाग निहाय ही भरती प्रक्रिया होणार असून एकाच दिवशी 72 हजार पदांसाठी परिक्षा होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारीला सुरुवात केलीय.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्वाची घोषणा केली होती. राज्यातल्या विविध 72 हजार पदासांठी  काही महिन्यांपूर्वी ही मेगाभरती राज्य सरकारनं घोषीत केली होती मात्र त्यावर वाद झाल्याने ती थांबवण्यात आली होती.

राज्यातील मेगाभारती प्रक्रिया सुरू

- 72 हजार पदांची भरती

- पुढच्या आठवड्यात जाहिराती निघणार

- फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा

- प्रत्येक विभागनिहाय भरती

- एकाच दिवशी होणार 72 हजार पदांसाठी परीक्षा

- प्रशासनाची तयारी सुरू

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना अशी भरती का करण्यात येत आहे असा सवाल विरोधी पक्षांसह विविध संघटनांनी विचारला होता. त्यावर मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवून इतर पदांसाठी भरती आहे असा सरकारचा युक्तिवाद होता. मात्र जास्त विरोध झाल्याने शेवटी सरकारला हा निर्णयच स्थगित करावा लागला. आता आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याने सरकारने ही मोठी घोषणा केली.

VIDEO : मराठा आरक्षण जाहीर होताच अंबाबाईला असं घातलं दंडवत

First published: December 4, 2018, 6:49 PM IST

ताज्या बातम्या