पडद्यामागे नक्की काय झालं? महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठा ट्विस्ट

पडद्यामागे नक्की काय झालं? महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठा ट्विस्ट

महाराष्ट्राला नव्हे तर देशाला धक्का देणाऱ्या घडामोडी एका रात्रीत घडल्या आहेत. पडद्यामागच्या घडामोडी अजून पुरत्या उलगडल्या नसल्या, तरी या घटनाक्रमाचा हा भाग १..

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर : महाराष्ट्राला नव्हे तर देशाला धक्का देणाऱ्या घडामोडी एका रात्रीत घडल्या आहेत. शुक्रवारी संध्याकाळी महाविकास आघाडीचं पर्यायी सरकार देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक पार पडली आणि त्यात सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. या बैठकीला हजर असलेले अजित पवार दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत थेट भाजपबरोबरच्या सरकारमध्ये सामील झाले.

शुक्रवारच्या बैठकीत नेमकं काय?

एका रात्रीत नेमकं काय घडलं हे अजून पुरतं स्पष्ट झालेलं नसलं, तरी पडद्यामागच्या घडामोडींचा भाग १ हळूहळू समोर येत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठकीतून बाहेर पडताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, "माझ्याकडे आत्ता सांगण्यासारखं पूर्ण काही नाही. अर्धवट माहिती मी देणार नाही. अजून चर्चा सुरू आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देईन." कुठलाही प्रश्न अनुत्तरित ठेवणार नाही असं सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यातून चर्चा संपली नसल्याचं सांगितलं.

त्याच वेळी दिल्लीत वेगवान घडामोडी घडत होत्या. पहाटेच राजभवनावर शपथविधीची तयारी झाली आणि सकाळी 8 च्या आत शपथविधी झालासुद्धा.

अजित पवारांच्या निर्णयाला माझा पाठिंबा नाही, शरद पवारांच्या वक्तव्याने मोठी खळबळ

त्याअगोदरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सहीचं पत्र राज्यपालांना आलं. महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट उठवल्याचं स्पष्ट झालं आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. या शपथविधीला राष्ट्रवादीचा अन्य कुणी नेता उपस्थित नव्हता.

राष्ट्रवादी फुटली?

सकाळपासूनच्या घडामोडी एवढ्या वेगाने घडत आहेत, की यावर आता विरोधात बसणाऱ्या नेत्यांच्याही प्रतिक्रिया अद्याप आलेल्या नाहीत. शरद पवार यांनी केलेल्या ट्वीटनुसार, राष्ट्रवादीचा या निर्णयाला पाठिंबा नाही. हा अजित पवार यांनी घेतलेला निर्णय़ आहे. पण त्याचबरोबर शरद पवार यांना समजून घ्यायला १०० वर्षं लागतील, असं संजय राऊत म्हणाले होते. त्याचीही इथे आठवण ठेवायला हवी.

अजित पवार यांचा गट राष्ट्रवादीतून फुटला असण्याची शक्यता आहे. कालच्या बैठकीला उपस्थित असलेले अजित पवार अचानक फुटले कसे? शिवसेनेच्या पर्यायी सरकारात कदाचित अजित पवार यांना मोठं खातं मिळण्याची शक्यता नसल्याची यात शक्यता आहे.

राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

अन्य बातम्या

मोठी बातमी : महाराष्ट्राच्या घडामोडींवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीत उभी फूट? फक्त अजित पवार गटाने भाजपला पाठिंबा दिल्याची शक्यता

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2019 09:48 AM IST

ताज्या बातम्या