प्रीतम मुंडे अडचणीत येणार? शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप

प्रीतम मुंडे अडचणीत येणार? शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप

प्रीतम मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली, असा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

  • Share this:

बीड, 5 जुलै : लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळवणाऱ्या भाजप (bjp) खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) या अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण प्रीतम मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली, असा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यानच अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता कालिदास आपेट यांनी वकिलांमार्फत प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. याबाबत 'लोकसत्ता'ने वृत्त दिलं आहे.

काय आहे प्रीतम मुंडे यांच्याबाबतचा आक्षेप?

1. 'प्रीतम गोपीनाथ मुंडे' नावाने बीड जिल्ह्यातील नाथरा येथे मतदार यादीत प्रीतम यांचं नाव आहे. तर मुंबई येथील वरळीमध्ये प्रीतम गौरव खाडे नावाने त्यांचं मतदार यादीत नाव असल्याचा आरोप कालिदास यांच्य़ाकडून करण्यात आला आहे.

2. मुंबईतील वरळी येथील प्लॉट 1201 स्थावर मालमत्तेची माहिती प्रीतम मुंडे यांनी लपवली असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

3. प्रीतम मुंडे यांच्याकडे वेगवेळ्या नावाने आयकर विभागाचे दोन ओळखप्रत्र आहे असंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.

4. प्रीतम मुंडे या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळात सहभागी आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या गुन्हय़ाची माहिती त्यांनी लपवली.

दरम्यान, प्रीतम मुंडे यांच्याबाबत या चार मुख्य आक्षेपांसह एकूण सहा आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्याच्या आरोपात तथ्य आढळल्यास प्रीतम मुंडे यांचं पद धोक्यात येऊ शकतं.

लोकसभा निवडणुकीत विजय

लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा पराभव केला. यावेळीची निवडणूक प्रीतम मुंडे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल, असं बोललं जात होतं. मात्र प्रीतम यांनी राष्ट्रवादीवर मोठा विजय मिळवला.

World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा

First published: July 5, 2019, 12:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading