बीड, 18 जुलै : जीवघेण्या दुष्काळामुळे मराठवाडा होरपळून निघाला आहे. पावसानंही येथे पाठ फिरवली आहे. स्थानिकांची थेंब-थेंब पाण्यासाठी वणवण सुरू आहे. विहिरींनी अक्षरशः तळ गाठलं आहे. पाण्याशिवाय जगायचं तरी कसं? या न सुटणाऱ्या प्रश्नासमोर मराठवाडावासीय हतबल झालेले असताना एका माथेफिरूनं पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतच विष टाकल्याचे संतापजनक वृत्त समोर आले आहे. गेवराई तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. भोजगावासह वस्ती, तांड्यांना पाणी पुरवठा करणार्या विहिरीत अज्ञात माथेफिरूने दोन बाटल्या कीटकनाशक ओतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (18 जुलै) सकाळी विहिरीवर पाणी भरण्यासाठी आलेल्या लोकांमुळे हा प्रकार उजेडात आला.
(पाहा :VIDEO : खेकड्याने डोंगरीतली इमारत पाडली का? अजित पवारांची टोलेबाजी)
गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील रावसाहेब शिंदे यांच्या शेतातील विहिरीतून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होतो. दुष्काळी परिस्थितीमध्ये परिसरात बहुतांश विहिरी, बोअर वेल आटल्या आहेत. केवळ गावालगतच्या रावसाहेब शिंदे यांच्या शेतातील विहिरीतील पाणी असल्याने ती विहिरी शासनाने अधिग्रहण केली होती. भर उन्हाळ्यात या विहिरीतून टँकर भरले जात होते आणि त्या टँकरमधून वाडी, वस्ती, तांड्यावरील लोकांची तहान भागवली जात आहे. मात्र बुधवारी (17 जुलै)रात्री अज्ञात माथेफिरूने याच विहिरीत तसंच पाणी काढणार्या मोटरच्या वॉलमध्येही कीटकनाशकाचे ओतल्यानं स्थानिकांसमोरील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.
(पाहा :या 10 दिवसात आघाडीला पडणार खिंडार, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट)
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रावसाहेब शिंदे यांनी तातडीनं याची माहिती गेवराई पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी घटनास्थळ गाठत परिस्थितीची पाहणी केली. विहिरीतील पाण्याची नमुने तपाण्यासाठी ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली आहे.
(पाहा :औरंगाबादेत MIM नगरसेवकांनी विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात खाल्ले डबे)
निसर्गाच्या दुष्टचक्राचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यातील स्थानिकांना आता मानवनिर्मित संकटांना सामोरं जावं लागत आहे. या घडल्या प्रकारामुळे या विकृत मानसिकतेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. लोकांच्या जिवावर उठलेल्या माथेफिरूला तातडीनं अटक करा, अशी मागणी केली जात आहे.
VIDEO : प्रेयसीच्या घरी रंगेहात सापडला पती, मग काय पत्नीने धु-धु धुतले