शाळांमधल्या कॅन्टीनमध्ये 'जंक फूड'वर बंदी

शाळांमधल्या कॅन्टीनमध्ये 'जंक फूड'वर बंदी

  • Share this:

09 मे : शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे लठ्ठपणा, दातांचे विकार, मधुमेह, हृदयविकार यांच्यासह अन्य आजारांचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने शाळेनच्या कॅन्टीनमध्ये जंक फूडची विकायला बंदी घतली आहे.

मीठ, साखर आणि मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा आणि अन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळांमध्ये जंक फूड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या खाद्यपदार्थांवर बंदी :

पिझ्झा, बर्गर, नुडल्स, कोल्ड्रिंक्स, बिस्किट, केक, चिप्स, चॉकलेट्स, पाणीपुरी, रसगुल्ले, गुलाबजाम, पेढा

या पदार्थांना परवानगी :

इडली, सांबर, वडा, पुलाव, पराठा, उपमा, खीर, दलिया, भाज्यांचे सँडवीच, नारळाचे पाणी, जलजिरा, पपई, टोमॅटो, अंडी

First published: May 9, 2017, 10:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading