अटकपूर्व जामिनासाठी अजित पवारांचे प्रयत्न? राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला राहणार अनुपस्थित

अटकपूर्व जामिनासाठी अजित पवारांचे प्रयत्न? राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला राहणार अनुपस्थित

टकपूर्ण जामीन मिळावा, यासाठी अजित पवार हे सध्या मुंबईत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • Share this:

पुणे, 27 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदारपूरमधील शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित राहणार आहेत. शिखर बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणात अटकपूर्ण जामीन मिळावा, यासाठी अजित पवार हे सध्या मुंबईत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अजित पवार यांनी हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला आज अनुपस्थित राहणार आहेत.

बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

पक्षाला गळती लागल्याने धक्के बसत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला आणखी एक हादरा बसलाय. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 31 बँक संचालकांविरुद्ध पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरून कोर्टाने काही दिवसांपूर्वीच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर आज गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आल्याने अजित पवार अडचणीत सापडले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने त्याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अत्यंत मनमानी पद्धतीने कर्जवाटप केलं, असा आरोप आहे.

अजित पवारांचं काय आहे स्पष्टीकरण?

कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर अजित पवार यांनी या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी स्पष्टीकरण दिलं होतं. 'कोर्टाने 75 लोकांबाबतीत निकाल दिला आहे. त्या बँकेच्या एकाही लोन कमेटीला आणि एक्झिक्युटिव्ह कमेटीला मी हजर नाही. 75 लोकांपैकी भाजपचे हयात नसलेले मंत्री भाऊसाहेब फुंडकर देखील होते. शिवसेनेचे केंद्रातील माजी अर्थमंत्री यांचाही त्यात समावेश आहे. पण मीडिया मात्र फक्त अजित पवार अजित पवार करत आहे. काय माझ्याबद्दल त्यांना एवढे प्रेम आहे. या बँक प्रकरणात मी एक रुपयात सुध्दा मिंदा नाही हे जाहीर भाषणात सांगतो,' असं म्हणत अजित पवारांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

VIDEO: 'तुम्ही मागितला तर अंगठाही देऊ, पण...' पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना शब्द

Published by: Akshay Shitole
First published: August 27, 2019, 11:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading