उद्या महाराष्ट्र बंद नाही, फक्त राहुल फटांगळेसाठी शोकसभा; मराठा मोर्चाचं स्पष्टीकरण

उद्या महाराष्ट्र बंद नाही, फक्त राहुल फटांगळेसाठी शोकसभा; मराठा मोर्चाचं स्पष्टीकरण

उद्या राहुल फटांगळेचा दहावा असल्यामुळे सकाळी 8 वाजता शोकसभा घेतली जाणार आहे असंही संघटनेनं स्पष्ट केलं.

  • Share this:

09 जानेवारी : 10 तारखेला मराठा संघटनांनी बंद पुकारला अशी अफवा सोशल मीडियावर पसरलीये. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीही ही अफवा असून आम्ही कोणताही बंद पुकारला नाही असं स्पष्ट केलंय. उद्या राहुल फटांगळेचा दहावा असल्यामुळे सकाळी 8 वाजता शोकसभा घेतली जाणार आहे असंही संघटनेनं स्पष्ट केलं.

पुण्यात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि राहुल फटांगळेचा भाऊन तेजस धावडेनं संयुक्त पत्रकार परिषद घेतली.  या पत्रकार परिषदेत राहुल फटांगळे याच्या खून खटला आणि हिंसाचार,तोडफोडीमध्ये झालेल्या नुकसान भरपाई केसमध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी राहुलचा मावसभाऊ तेजस धावडे याने केलीय.

तसंच या प्रकरणात मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांचा सहभाग आहे का नाही हे माहीत नाही याचा तपास पोलिसांनी करावा असं तेजसने म्हटलंय.

तर मराठा क्रांती मोर्चाने राहुलच्या स्मरणार्थ व्यायाम शाळा बांधावी तसंच कोरेगाव भीमा आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचार,दगडफेकीत नुकसान झालेल्या सर्वाना तातडीने नुकसान भरपाई मिळावी आणि या प्रकरणाला जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाईकरावी अशी मागणी केलीये.

राज्यात 10 जानेवारी रोजी कोणताही बंद नाही. राहुल फटांगळे याचा दहावा विधी कान्हूर मसाई या गावी सकाळी 8 वाजता होणार आहे. फक्त सकाळी 8 वाजता शोकसभा होणार आहे अशी माहितीही मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिली.

First published: January 9, 2018, 4:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading