VIDEO : उद्धव ठाकरेंविरोधात अपशब्द,अंबादास दानवे आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की

VIDEO : उद्धव ठाकरेंविरोधात अपशब्द,अंबादास दानवे आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काहीही खपवून घेणार नाही. जे काही होईल त्या परिणामांना मी सामोरं जाण्यासाठी तयार आहे असंही दानवेंनी म्हटलंय.

  • Share this:

औरंगाबाद, 09 आॅगस्ट : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली होती. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं झाली. पण आंदोलनाचं केंद्र बिंदू असलेल्या औरंगाबादेत आंदोलनाला हिंसक वळण लागले. एवढंच नाहीतर आंदोलनादरम्यान  शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्कीही झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या अंबादास दानवेंनी आंदोलनात एक तरुणाला मारहाण केली.

औरंगाबादेत आज सकाळी क्रांतीचौक इथं मराठा क्रांती मोर्चा समितीच्या वतीने काकासाहेब शिंदे या तरुणाला श्रद्धांजली देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी अंबादास दानवे पोहोचले होते. आंदोलनात सहभागी झाल्यानंतर तिथे काही तरुणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात  घोषणाबाजी सुरू केली. या तरुणांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात अपशब्द वापरला आणि घोषणाबाजी करत होते. त्यामुळे अंबादास दानवेंना राग अनावर झाला आणि त्यांनी भर आंदोलनात तरुणाला मारहाण केली. याबद्दलचा व्हिडिओ व्हायरल झाला.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी खुलासा केलाय. "मी कोणत्याही आंदोलनांवर राग काढत नाही. मी पहिल्या दिवसांपासून मराठा आंदोलनात सहभागी आहे. जेव्हा औरंगाबादमध्ये पहिला मोर्चा निघाला होता. तेव्हा मी आंदोलनात सहभागी झालो होतो. मी शिवसैनिकही आहे. शिवसैनिक असलो तरी आज आंदोलनात अत्यंत शांतपणे सहभागी झालो होतो. सकाळी जेव्हा आंदोलनात सहभागी झालो तेव्हा काही तरुण हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात अपशब्द वापरून घोषणाबाजी करत होते त्यामुळे मी उत्तर दिले असं स्पष्टीकरण दानवेंनी दिलं.

जर आपल्या पक्षाच्या पक्षप्रमुखाविरोधात अपशब्द वापरला जात असेल तर मीच काय कोणताही शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या विरोधात अपशब्द खपवून घेऊ शकत नाही. मराठा समाजातील तरुण उद्धव ठाकरेंचा आदर करतो. पण आज आंदोलनात कुणी बाहेरचा प्रवृत्तीचा घुसून मुद्दाम घोषणाबाजी केली असावी असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

तसंच उद्धव ठाकरेंच्या विरोधात काहीही खपवून घेणार नाही. जे काही होईल त्या परिणामांना मी सामोरं जाण्यासाठी तयार आहे असंही दानवेंनी म्हटलंय.

संबंधीत बातम्या

VIDEO : 'आरक्षण आमच्या हक्काचं...नाही कोणाच्या...',काकांच्या घराबाहेर पुतण्याचा 'ठिय्या'

Maharashtra Band : महाराष्ट्र बंदला जाळपोळ,तोडफोडीचे गालबोट !

VIDEO : आैरंगाबादेत कंपन्यांची तोडफोड,कंटेनर पेटवला

 VIDEO : पुण्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज,अश्रूधुराची नळकांड्या फोडल्या

VIDEO : मराठा आंदोलनात घोषणाऐवजी मंगलाष्टक,जोडप्याचं शुभमंगल सावधान !

 

First published: August 9, 2018, 9:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading