मुंबई, 11 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (lakhimpur kheri case) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार आज महाराष्ट्र्र बंदची हाक दिली आहे. आज 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं (Maharashtra Bandh 2021) आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे.
केंद्र सरकारला या बंदमधून सरकारला इशारा देण्यासाठी जनेतेने स्वतःहून पाठिंबा देण्यासाठी बंदमध्ये सहभागी असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या बंद मध्ये सहभागी होणार आहेत.
आज महाराष्ट्र बंद, नवी मुंबईतील APMC बंद pic.twitter.com/VOCskLIfI7
— News18Lokmat (@News18lokmat) October 11, 2021
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
किसान सभेचाही महाराष्ट्र बंदला सक्रिय पाठिंबा
किसान सभेच्या सर्व शाखा महाराष्ट्र बंदमध्ये अत्यंत सक्रियपणाने सहभागी होत आहेत. किसान सभेचे काम आलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये गाव, शहर, तालुका व जिल्ह्यामध्ये 'बंद' यशस्वी करण्यासाठी सर्व समविचारी पक्ष व संघटनांच्या तातडीने बैठका घेऊन बंदचे नियोजन करण्याचे आवाहन शाखांना केले आहे, अशी माहिती किसान सभेनं दिली आहे. 'जनतेनं या बंदमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेकडून करण्यात आलं आहे.
औरंगाबाद बंद ...मुख्य बाजारपेठ गुलमांडी pic.twitter.com/nT0wwi0ap9
— News18Lokmat (@News18lokmat) October 11, 2021
मुंबईत डब्बेवाल्यांचा बंदला पाठिंबा
मुंबईतील चाकरमान्यांना डब्बा पुरवणाऱ्या मुंबईतील डब्बेवाल्यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या बंदला पाठिंबा दिला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून हा बंद असणार आहे. त्यामुळे बंद जरी सुरू असला तरी काम सुरू राहणार आहे, असंही डब्बेवाला संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
एसटी आणि बेस्ट बस सेवा बंद राहणार, शिवसेनेच्या संघटनेचा पाठिंबा
लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्र बंदची उद्या हाक दिली आहे. राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र बंदची तयारी होत आहे. शाळा आणि महाविद्यालय बंद असणार आहे. तर दुसरीकडे मुंबईची बेस्ट वाहतूक सेवाही बंद राहणार आहे. त्याच पाठोपाठ गावागावात पोहोचलेली एसटी बस सेवा सुद्धा बंद राहणार आहे. शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वाहतुकीवर उद्या परिणाम होणार आहे.
हेही वाचा- 'मुंबई डबेवाला असोसिएशन' चा महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा
तर दुसरीकडे, आजच्या बंदमध्ये बेस्ट वर्कर्स युनियन सहभागी होणार नाही. बेस्ट ही अत्यावश्यक सेवा आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असा शासनाचा निर्णय असताना बेस्ट बंदमध्ये सहभागी होऊ शकत नाही, बेस्ट कामगार सेना कर्मचाऱ्यांना बंदचे आवाहन करून राज्य सरकारच्या निर्णयाचं उल्लंघन करत आहे, असा आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला आहे.
मुंबईत काही व्यापाऱ्यांचा विरोध
मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी या बंदला विरोध केला आहे. आज दुकाने सुरुच राहतील. मात्र, आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, असे आवाहन विरेन शाह यांनी मुंबई व्यापारी संघामार्फत केलं आहे.
ठाण्यातही बंदला विरोध
ठाण्यातील काही व्यापारी संघटनांनी देखील महाराष्ट्र बंदला विरोध केला आहे. या व्यापारी संघटनांनी आमचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नसल्याचं म्हटलं आहे. कोरोनाकाळात व्यापार बंद असल्याने आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगत ठाण्यात काही संघटनांनी ही भूमिका घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Mumbai