News18 Lokmat

लातूरमधून परदेशात संशयास्पद काॅलिंग, दोघांना अटक

लातूर जिल्ह्यातून थेट परदेशात आणि परदेशातून थेट लातूर जिल्ह्यात संशयरित्या कॉलिंग करणाऱ्या दोघांना औरंगाबाद ATS आणि लातूर पोलिसांनी अटक केलीय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2017 02:26 PM IST

लातूरमधून परदेशात संशयास्पद काॅलिंग, दोघांना अटक

17 जून : लातूर जिल्ह्यातून थेट परदेशात आणि परदेशातून थेट लातूर जिल्ह्यात संशयरित्या कॉलिंग करणाऱ्या दोघांना औरंगाबाद ATS आणि लातूर पोलिसांनी अटक केलीय.

शहरातल्या प्रकाश नगर आणि नंदी स्टॉप भागातून परदेशात ISD कॉलिंग नेहमीच होत असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागानं दिली होती. त्यानुसार औरंगाबाद ATS आणि लातूर पोलिसांनी संयुक्तरित्या कार्यवाही करत दोघांना अटक केलीय. त्याचबरोबर त्यांच्याकडुन अनेक सिम कार्ड ही जप्त करण्यात आले आहे.

आरोपींनी परदेशात कॉल करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे अॅप तयार केले होते. अॅप आणि एक विशिष्ट प्रकारच्या मशिनच्या सहाय्याने थेट परदेशात कॉलिंग सुरू असल्याचा उद्योग अनेक दिवसापासून सुरू होता. हे फोन कॉल आंतरराष्ट्रीय असले तरी याची खबर मोबाईल कंपनीला मिळत नव्हती.

तसंच फोन करणारा आणि फोन रिसिव्ह करणारा या दोघानाही शुल्क लागत नसल्यानं शासनाचं मोठं नुकसान होत होतं. शिवाय अशा पद्धतीनं परदेशात नेमके कोणाला कॉल करण्यात येत होते ? तसंच या मागचा उद्देश काय आणि देशविरोधी कारवाया करण्याचा हेतू होता का ? याचा तपास आता ATS आणि लातूर पोलिस करतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2017 02:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...