सर्वपक्षीय आमदारांच्या फोटोसेशनला फडणवीस आलेच नाहीत! दिलं 'हे' कारण

सर्वपक्षीय आमदारांच्या फोटोसेशनला फडणवीस आलेच नाहीत! दिलं 'हे' कारण

फोटोसेशनला भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मात्र आले नसल्याचं पाहायला मिळालं.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई, 20 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनातील प्रथेप्रमाणे सभागृहाबाहेर सर्वपक्षीय आमदारांचा एकत्रित फोटो काढण्यात आला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र या फोटोसेशनला भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मात्र आले नसल्याचं पाहायला मिळालं.

भाजपची बैठक सुरु असल्याने देवेंद्र फडणवीस आजच्या फोटोसाठी येऊ शकले नाहीत, माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही फोटोसाठी अनुपस्थित होते. या दोघांच्या अनुपस्थितीची सभागृहाबाहेर चांगलीच चर्चा सुरू होती.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी दरवर्षी सर्वपक्षीय आमदारांचा फोटो काढण्यात येतो. मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि ज्येष्ठ मंत्री पहिल्या रांगेत असतात. तर इतर विधिमंडळाचे ज्येष्ठ नेते दुसऱ्या रांगेत असतात. त्यानंतर इतर तरूण आमदार उभे असतात. हिवाळी अधिवेशनातील हीच प्रथा यंदाही सुरू ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मात्र देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी या फोटोसेशनला दांडी मारली.

दरम्यान, आता विधानसभेच्या आमदारांचा फोटो काढण्यात आला. विधान परिषदेचं कामकाज सुरू असल्यानं तिथले आमदारही या फोटोसेशनला उपस्थित राहू शकले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2019 11:19 AM IST

ताज्या बातम्या