'शिवसेनेची आता सोनियासेना झाली आहे', भाजप नेत्याचा तिखट हल्ला

'शिवसेनेची आता सोनियासेना झाली आहे', भाजप नेत्याचा तिखट हल्ला

विधिमंडळ अधिवेशनात झालेल्या गदारोळावरून सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

  • Share this:

नागपूर, 17 डिसेंबर : 'शिवसेनेचा प्रवास आता शिवसेना ते सोनियासेना असा झाला आहे,' असं म्हणत भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. विधिमंडळ अधिवेशनात झालेल्या गदारोळावरून सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

'बॅनरची प्रथा आम्ही नाही सध्याच्या सत्ताधा-यांनी आणली आहे. शिवसेनेला आपल्या वचनाचा सत्तेत आल्यावर विसर पडला का?' असा सवाल करत सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर चौफेर टीका केली आहे. अधिवेशन सुरू असताना भाजपच्या आमदारांनी सभागृहातच बॅनर झळकावले. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेनेवरच पलटवार केला आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून अधिवेशनात मोठा राडा

शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्या, अशी शिवसेनेची जुनी मागणी पुढे आणत भाजपने सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. या मागणीवर जोपर्यंत निर्णय घेण्यात येत नाही तोपर्यंत पुढील कामकाज करू नका, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

सावरकरांच्या अपमानावरून पंकजा मुंडे यांनी साधला राहुल गांधींवर निशाणा

आमदारांना देणार कानमंत्र

शिवसेना आमदाराचं स्पष्टीकरण

अधिवेशन सुरू असताना शिवसेना आणि भाजपच्या दोन आमदारांमध्ये थेट हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ उडाला होता. ज्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली त्यातील शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सायरसने शाळेत झोपायला चक्क कॉटच आणला, शरद पवारांनी सांगितले मित्राचे धम्माल किस्से!

'आम्ही विदर्भातून आमदार म्हणून निवडून आलो आहोत. अधिवेशनादरम्यान विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी आमची अपेक्षा होती. मात्र भाजपच्या आमदारांनी गोंधळ घालून कामाकाजात अडथळा आणला. तसंच परवानगी नसताना थेट सभागृहात बॅनर झळकावले. एवढंच नव्हे तर मंत्री महोदय बोलत असताना त्यांच्यासमोरही बॅनर आणले. यामुळे आमचा संताप झाला. यातून ती घटना घडली,' अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 17, 2019, 1:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading