चंद्रकांत पाटलांनी इशारा करताच अजित पवारांनी केला नमस्कार, सभागृहात मोठा हशा

चंद्रकांत पाटलांनी इशारा करताच अजित पवारांनी केला नमस्कार, सभागृहात मोठा हशा

चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना इशारे करून तुम्ही इकडे येताय का? अशी कोटी केली.

  • Share this:

नागपूर, 20 डिसेंबर : पुरवणी मागण्यांवर सहकाराविषयी बोलत असताना भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना इशारे करून तुम्ही इकडे येताय का? अशी कोटी केली. त्यावरच अजित पवार यांनी नमस्कार करून उत्तर दिलं.

विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला होता. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांत सत्तास्थापनेची बोलणी सुरू असतानाच अजित पवार यांनी सर्वांना धक्का देत भाजपला पाठिंबा दिला. या पाठिंब्याच्या जोरावरच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र नंतर अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने हे सरकार कोसळलं.

अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवरच चंद्रकांत पाटील यांनी इशारा करून कोटो करण्याचा प्रयत्न केला. मात्र चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्याकडे बघून इशारा करताच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी असे कोणतेही इशारे करू नका, असं सांगितलं. मात्र त्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे काही वेळ सभागृहात हशा पिकला होता.

अजित पवारांविरोधात देवेंद्र फडणवीस आक्रमक, क्लीन चिटला केला विरोध

पवार-पाटील काही दिवसांपूर्वी दिसले होते एकत्र

हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असताना अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकत्रित विमान प्रवास केला होता. मुंबई-नागपूर अशा एकत्रित प्रवास हिवाळी अधिवेशनासाठी हे दोन्ही नेते नागपुरात एकत्र दाखल झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांनी जोर धरला.

विमान प्रवासापूर्वी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये विमानतळावर जवळपास पाऊण तास गप्पा रंगल्या. यावेळी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील हेदेखील उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2019 04:41 PM IST

ताज्या बातम्या