महाविकास आघाडीत पेच! ठाकरे सरकारमध्ये मंत्र्यांनी शपथ तर घेतली पण...

महाविकास आघाडीत पेच! ठाकरे सरकारमध्ये मंत्र्यांनी शपथ तर घेतली पण...

मंत्रिमंडळाचं खातेवाटप हिवाळी अधिवेशनाच्या आधी की नंतर यावर आता चर्चा सुरू.उपमुख्यमंत्रिपद आणि अन्य महत्त्वाची खाती कोणाकडे जाणार याकडे लक्ष.

  • Share this:

सागर कुलकर्णी मुंबई, 02 डिसेंबर: विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध नाना पटोले तर विरोधी पक्षनेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. आता लक्ष खाते वाटपाकडे आहे. दरम्यान 3 आणि 4 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे खातेवाटपाबाबत आता उत्सुकता आहे. तसंच उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र अजूनपर्यंत कोणाचाच नावावर शिक्कामोर्तब झालं नाही.

महाविकास आघाडीत काही मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी झाला असला तरीही अद्यापही या मंत्र्यांना कोणतंही खातं देण्यात आलं नाही. अजून खातेवाटपाबाबत वाटाघाटी सुरू असल्याची स्थिती महाविकासआघाडीत आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर शिवतीर्थावर संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच दिवशी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आज 2 डिसेंबर तारीख उलटून देखील कॅबिनेट पदाची शपथ घेतलेले मंत्री कोणत्या खात्याचा कारभार पाहणार हे स्पष्ट झाले नाही.

वाचा-पंकजा मुंडे भाजप सोडणार का? त्यांच्या विश्वासू आमदाराने केला मोठा खुलासा

खातेवाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये मतमतांतर असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकच नाही तर उपमुख्यमंत्रिपदाबाबतही अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. जयंत पाटील आणि अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदाच्या नावासाठी चर्चा आहे. मात्र अद्यापही कोणाच्याही नावावर उपमुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला नाही. एकूणच खातेवाटपला होत असलेल्या विलंबामुळे बिन खात्याचे कॅबिनेट मंत्री अशीच आमदारांची अवस्था झाली आहे.

तिन्ही पक्षांमध्ये अजून खातेवाटपाबाबत ठरत नसल्यानं सात मंत्र्यांनी शपथ घेऊन देखील त्यांची खाती अद्यापही स्पष्ट झालेली नाहीत. येत्या काळात मंत्रिमंडळ विस्तार यावरून तिन्ही पक्षात अंतर्गत नाराजी वाढू शकते. यामुळे नागपूरला होणाऱ्या अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करावा का? की नागपूर अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा? असे दोन मतप्रवाह समोर येत असल्याचे समजतं आहे. त्यासोबतच नगरविकास, गृहखातं, महसूल खातं कोणाच्या गोटात जाणार याबाबतही मतमतांतर आहेत. त्यामुळे महत्त्वाची खाती शिवसेना आपल्याकडे ठेवणार की राष्ट्रवादीकडे देणार यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं समजतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 07:50 AM IST

ताज्या बातम्या