वगळलेल्या मंत्र्यांची पहिल्या दिवशी अधिवेशनाला दांडी

वगळलेल्या मंत्र्यांची पहिल्या दिवशी अधिवेशनाला दांडी

प्रभावी कामगिरी नसल्याने या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णया मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं सांगितलं जातंय.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 17 जून : विधिमंडळाचं शेवटचं अधिवेशन आजपासून (17 जून) मुंबईत सुरु झालं. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात जुन्या 6 मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. ते सर्व मंत्री आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गैरहजर होते. राजीनामे दिलेले मंत्री आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळात आलेच नाहीत. प्रभावी कामगिरी नसल्याने या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णया मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं सांगितलं जातंय.

राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, अंबरिष अत्राम यांचे रविवारी राजीनामे घेण्यात आले होते.

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केलं. राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रकाश मेहता यांच्याकडील गृहनिर्माण हे महत्त्वाचं खातं देण्यात आलंय. त्यांना कृषीमंत्री व पणन खाते मिळेल अशी अपेक्षा असंही बोललं जात होतं. आत्तापर्यंत ज्या खात्यावरून विखे पाटलांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्याच खात्याचा मंत्री म्हणून ते आता विरोधीपक्षांना सामोरे जाणार आहेत.

विनोद तावडे यांच्या खात्यात कपात करून त्यांच्याकडे असलेला शिक्षण विभाग शेलार यांना देण्यात आलाय. अनिल बोंडेंना कृषी खातं देऊन मोठी जबाबदारी दिलीयं तर चंद्रकांत पाटील यांच्याकडच्या अतिरिक्त खात्याचा कार्यभार काढून घेतलाय तसंच त्यांचं मदत आणि पुनर्वसन हे खातंही सुभाष देशमुखांना देत त्यांचा भार हलका केलाय. पण त्यांचे महसूल खातं कायम ठेवत त्यांचं महत्त्वही अबाधित ठेवलंय

असं आहे खातेवाटप आणि फेरबदल

राधाकृष्ण विखे पाटील - गृहनिर्माण मंत्री

जयदत्त क्षीरसागर - रोजगार हमी आणि फलोत्पादन

आशिष शेलार - शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

संजय कुटे - कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग

सुरेश खाडे - सामाजिक न्याय

राम शिंदे - पणन आणि वस्त्रोद्योग

सुभाष देशमुख - सहकार, मदत व पुनर्वसन

अनिल बोंडे - सामाजिक न्याय

अशोक उइके - आदिवासी विकास

तानाजी सावंत -जलसंधारण

संभाजी पाटील निलंगेकर - अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास,माजी सैनिकांचे कल्याण

जयकुमार रावल - अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार

राज्यमंत्री

योगेश सागर - नगरविकास

अविनाश महातेकर - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

संजय भेगडे - कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन

First published: June 17, 2019, 5:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading