राज ठाकरे 'मतलब निकल गया तो हम नही जानते'; भाजप नेत्याची जिव्हारी टीका

राज ठाकरे 'मतलब निकल गया तो हम नही जानते'; भाजप नेत्याची जिव्हारी टीका

'हातवारे करून जर मतदान झालं असते तर हातवारे करणारे समाजात अनेक आहेत. पराभव झाल्यानंतर माणूस खचतो, पवार साहेबांचं आताचं ते रुप आहे.'

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर : राज्याचे अर्थमंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांवर सडकून टीका केली आहे. न्यूज 18 लोकमतने घेतलेल्या मुलाखतीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींचा खुलासा केला तर यावेळी बोलताना त्यांनी सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा सांगत शिवसेनेच्या 10 रुपयांत जेवण देण्याच्या योजनेवरही टीका केली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारला असता 'एक वक्ता म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज ठाकरे यांचा वापर करून घेतला आणि मग मतलब निकल गया तो हम जानते नही. राज ठाकरे यांना ना पक्ष ओळखता येतो ना माणसं ओळखता येतात. मी राज ठाकरे यांना काही सल्ला देणार नाही. मी फक्त इतकं म्हणेन की फुल देवाच्या मस्तकावर जास्त शोभून दिसतं पण या फुलानं चूक केली' अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

'पुन्हा एकदा पक्षाला उभं करण्याचा पवारांचा प्रयत्न'

यावेळी मुलाखतीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांच्यावरही कठोर शब्दात टीका केली आहे. 'हातवारे करून जर मतदान झालं असते तर हातवारे करणारे समाजात अनेक आहेत. पराभव झाल्यानंतर माणूस खचतो; पवार साहेबांचं आत्ताचं ते रुप आहे. त्यांना पराभव पचवता येत नाही. पवारांनी वयाच्या 27 वर्षीपासून सत्ता पाहिली आहे. आयुष्याभर लाल दिव्याची गाडी बघितली आहे. आणि आज आपल्या जवळची लाल रक्ताची माणसं भाजपमध्ये जाताना पाहताना त्यांचे डोळे लालबुंद होणं स्वाभाविक आहे. त्यांना दुर-दुरपर्यंत त्यांच्या पक्षासाठी अंधार दिसत आहे. आता पक्षातली वादावादी पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवायचं की वादावादी हा प्रश्न त्यांच्याही समोर असेल. इतके वर्ष सत्ताधारी म्हणून असणारं वलय आहे. ते वलय नष्ट होताना जेव्हा पवार साहेब बघत असतील. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाला उभं करण्याचा असफल प्रयत्न करत आहेत'

तर सत्ता येणार नाही असा अंदाज आला की माणूस भावुक होतो. सत्ता त्यांच्यासाठी प्राण होता आणि अशा प्रकारे सत्ता जाताना दिसताना भावुक होणं स्वाभाविक आहे अशी टीका मुनगंटीवार यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्यावर केली आहे. दरम्यान, मुनगंटीवार यांनी केलेल्या या जहरी टीकेवर विरोधक आता काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

इतर बातम्या - पवारांच्या हातवारे करण्यावर मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका, पाहा काय म्हणले...

सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलाखतीतले महत्त्वाचे मुद्दे

- मी लोकांना केलेल्या कामाचा आवाज देतोय

- आम्ही भविष्यासाठी काय करणार हे लोकांना सांगतोय

- जनतेचा शुभार्शीवाद आम्हाला मिळेल याची खात्री

- लोकांमधे आमच्या कामबद्दल समाधान

- आम्ही 14 तारखेपासूनच आमचं मुल्यांकन करणार

- चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत थेट लढत झाली

- चंद्रपुर लोकसभा निवडणुकीत अँटीइन्कंबंसी आणि अतिआत्मविश्वास नडला

- दारुबंदीचा फटका माझ्या मतदारसंघात बसला नाहीये

- मी आणि हंसराज अहिर यांच्यात कोणतेही मतभेद नाहीयंत

- तिकिट का कापलं असं वाटणं ही त्या नेत्यांना वाटणं स्वाभाविक आहे

- प्रत्येक नेता हा संघटनेत महत्वाचा आहे

- नेत्यांवर अन्याय व्हावा म्हणून तिकिटे कापली नाहीयंत, त्यांना भविष्यात निश्चितपणे महत्वाची जबाबादारी दिली जाईल

- काम देताना पूर्वकल्पना दिली जात नसते

- 10 रुपयात जेवण देणं वाईट नाही पण 10 रुपयात जेवण द्यावं लागणं हा चिंतनाचा विषय

- आपला प्रवास एखाद्या व्यक्तीला 10 रुपयात जेवण देणं याऐवजी तो 100 रुपयांची थाळी खाऊ शकेल असा असला पाहिजे (शिवसेनेला टोला)

इतर बातम्या - संतापजनक...शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थ्यीनीवर सामुहिक बलात्कार

- स्वातंत्र्याची 75 वर्षं होत असताना आपण आर्थिक चिंतन केले पाहिजे

- मुनगंटीवार - ....मला जर मंत्रीमंडळात संधी मिळाली.

प्रश्न - शंका आहे ?

मुनगंटीवार - प्रश्न शंकेचा नसतो हा निर्णय पक्षाचा असतो. पक्षाला वाटलं मला दुसरी जबाबादारी द्यायची तर दुसरी देईल. पक्षाला वाटलं की मी संघटनेत काम केलं पाहिजे तर संघटनेत करेल. याची चिंता मी कधी करत नाही कारण मी संघटनेचा एक सैनिक आहे

- खडसेंच्या राजीनाम्यानंतर मला महसूल खातं देऊ केलं होतं ते मी नाकारलं, मुनगंटीवार यांचा गौप्यस्फोट

- आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदाचा  विषय - स्वप्न पाहणं काही गैर नाही

- पूर्वी (आदित्य ठाकरेंकरता) शिवसेनेने उपमुख्यमंत्री पद मागितलं असतं तर त्याचा विचार झाला असता. पण आता आज काही त्याची चर्चा नाहीये

- आम्ही 30 टक्के सरकारी नोकर कपात या राज ठाकरेंच्या आरोपात काही तथ्य नाहीये. राज ठाकरे यांना माहिती देणारे योग्य माहिती देत नाहीत म्हणून त्यांच्या चुका होतात. 30 टक्के नोकर कपात शक्य नाहीये. थ्री इडीयट्सचा डायलॉग आहे, एकदा पेस्ट बाहेर काढल्यावर ती बाहेर काढता येत नाही.

- असा कोणताच विचार समोर आलेला नाहीये आणि राज ठाकरे यांनी मला काही विचारलं नाहिये. नाही तर मी माहिती सांगितली असती. भाषणासाठी काही मुद्दे लागतात, त्यासाठी असे मुद्दे किती योग्य ते जनता ठरवेल.

इतर बातम्या - 'शिवसेने'वरून नितेश आणि निलेश राणे बंधूंमध्ये मतभेद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 07:18 AM IST

ताज्या बातम्या