हे नेते बनणार विधानसभेचे अध्यक्ष तर अजित पवारांनाही महत्त्वाचं पद

हे नेते बनणार विधानसभेचे अध्यक्ष तर अजित पवारांनाही महत्त्वाचं पद

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या शपथ घेणार आहेत. त्याआधी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही महत्त्वाच्या पदांवर चर्चा सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या शपथ घेणार आहेत. त्याआधी महत्त्वाच्या पदांवर चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचं अध्यक्षपद मिळू शकतं. त्याचबरोबर अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या कॅबिनेटसाठीचा फॉर्म्युला आता ठरलाच आहे. महाविकास आघाडीची कॅबिनेट 15-13-13 या फॉर्मु्ल्यावर बनू शकते. यामध्ये शिवसेनेकडे 15, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 13 आणि काँग्रेसला 13 मंत्रिपदं मिळू शकतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याने शिवसेनेकडे 16 मंत्रिपदं होतात.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींनी उपमुख्यमंत्रिपदाच्या ऐवजी विधानसभा अध्यक्षपदाची मागणी केली, अशी माहिती आहे. आता यावर तिन्ही पक्ष निर्णय घेतील. पण सध्या तरी नावांची अधिकृत घोषणा झालेली नाही.

(हेही वाचा : दिल्लीतील त्या भेटीत PM मोदींनी धुडकावली शरद पवारांची विनंती अन्...)

उद्याच्या शपथविधीआधी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. काँग्रेस नेते अहमद पटेल, शरद पवार आणि उद्धव ठाकरेच आता यावर निर्णय घेतील.

याआधी काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांची नावं उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होती. त्यानंतर काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदाची मागणी केल्याची बातमी आली. त्यामुळे सोनिया गांधींनी मागणी केल्यानुसार काँग्रेस फक्त विधानसभा अध्यक्षपद घेतं की उपमुख्यमंत्रिपदावरही दावा सांगते ते पाहावं लागेल.

आता मुंबईतल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर याबद्दलचा निर्णय होऊ शकेल. उद्याच्या शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरेंसोबत कोणकोण शपथ घेणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवाजी पार्कवर या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.

==================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2019 06:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading