मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Assembly Monsoon Session : 'गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुहावाटी' विरोधकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला

Maharashtra Assembly Monsoon Session : 'गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुहावाटी' विरोधकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला

विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकत्र येतत जोरदार घोषणाबाजी केली.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकत्र येतत जोरदार घोषणाबाजी केली.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकत्र येतत जोरदार घोषणाबाजी केली.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 18 ऑगस्ट : '50 खोके...एकदम ओक्के...' अशी घोषणाबाजी करून विरोधकांनी पावसाळी अधिवेशचा (Maharashtra Assembly Monsoon Session) पहिला दिवस गाजवला. आज दुसऱ्या दिवशी 'गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुहावाटी' अशी घोषणाबाजी करून शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल चढवला. त्यामुळे शिंदे गटांच्या आमदारांना काही बोलायला जागा उरली नाही. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस विरोधकांनी घोषणाबाजीने गाजवला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकत्र येतत जोरदार घोषणाबाजी केली. 50 खोके...एकदम ओक्के, ईडी सरकार हाय हाय अशी घोषणा देणे सुरू केले. जेव्हा शिंदे गटाचे आमदार विधानभवनात जात होते, त्यावेळी विरोधकांच्या घोषणाबाजीला आणखी जोर वाढला. शिवसेनेच्या बंडखोर आमदार यामिनी जाधव जाताना विरोधकांनी 50 खोके एकदम..ओक्के...ईडी ईडी अशा घोषणा दिल्या. या घोषणाबाजीमुळे यामिनी जाधव काही न बोलता पुढे निघून गेल्या. त्यानंतर ईडीच्या कारवाईमुळे बेजार झालेले आमदार प्रताप सरनाईक आले. त्यावेळी आले आले गद्दार आले, 'गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो गुहावाटी' अशा घोषणा देऊन एकच हल्लाबोल केला. त्यामुळे सरनाईक यांनाही उलट घोषणा देऊन विधानभवनात जाणे पसंत केले. (नाराज बच्चू कडू अखेर अधिवेशनाला आले, शिंदे सरकारची काढली चूक, फोन टॅपिंग प्रकरणावरही भडकले) बुधवारी सुद्धा विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी एकत्र जमून शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी '50 खोके...एकदम ओके, ईडी सरकार हाय हाय' अशा घोषणा दिल्यात. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्पादन मंत्री शंभूराजे देसाई हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी चालले होते. त्यामुळे विरोधकांनी '50 खोके एकदम ओके' जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी शंभू राजे देसाई यांनीही 'पाहिजे का?' असं म्हणून विरोधकांना उत्तर दिलं.
First published:

पुढील बातम्या