9 वाजताचे 9 मोठे अपडेट्स : मतदारसंघातला आणि नेत्याचा निकाल इथे पाहा थेट LIVE

9 वाजताचे 9 मोठे अपडेट्स : मतदारसंघातला आणि नेत्याचा निकाल इथे पाहा थेट LIVE

अजित पवार, रोहित पवार, पंकजा- धनंजय मुंडे, चंद्रकांतदादा पाटील, आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यात कुणाला आघाडी कोण पिछाडीवर? तुमच्या मतदारसंघातला निकाल LIVE पाहण्यासाठी आमच्या इथे क्लिक करा.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. तुमच्या मतदारसंघातला निकाल LIVE पाहण्यासाठी आमच्या इथे क्लिक करा. सर्व 288  उमेदवारांचा एकत्रित निकाल इथे  पाहता येईल.

9 वाजेपर्यंतचे राज्यातले मुख्य 9 अपडेट्स

१.  परळीमध्ये धनंजय मुंडे आघाडीवर, पंकजा पिछाडीव

२. दक्षिण सोलापूर : काँग्रेसच्या प्रणिती शिंदे पिछाडीवर

३. कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील आघाडीवर

४. नागपूर आणि वरळी : देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे आघाडीवर

५.  नगर : संग्राम जगताप आघाडीवर

६. कर्जत जामखेड : रोहित पवार पिछाडीवर

७. नांदगाव : पंकज भुजवळ पिछाडीवर

८ . सेनेचे अब्दुल सत्तार आघाडीवर

९. बारामती : अजित पवार आघाडीवर

LIVE  निकालात काय आणि कसं पाहा?

महाराष्ट्रातल्या लक्षवेधी लढती आणि उमेदवारांचा LIVE अपडेट

प्रमुख उमेदवारांच्या थेट लढती इथे करा क्लिक

महाराष्ट्राचा नकाशा - कुणाला कोणती जागा इथे पाहा Map

मतदारसंघानुसार निकाल - इथे करा क्लिक

21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो.

Assembly Elections: Maharashtra Election Result 2019 LIVE: मोठी बातमी: परळीतून धनंजय मुंडे यांना 1 हजार मतांची आघाडी

या वेळी भाजप- शिवसेना-आरपीय महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा सरळ लढा होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही 101 जागा लढवत काही मतदारसंघात चुरशीची स्पर्धा निर्माण केली. वंचित बहुजन आघाडीमधून आणि MIM यांची फारकत झाल्याने एकत्रित परिणाम कमी झाला. तरी वंचित फॅक्टर मराठवाड्यात कमाल करतो का याची उत्सुकता आहे. प्रचारादरम्यान भाजप, शिवसेनेला खरी लढत दिली शरद पवार यांनी. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे सभांना गर्दी खेचली तरी त्याचा परिणाम मतपेटीवर किती झाला हे कळेलच.

2014 ची विधानसभेची परिस्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला.

Maharashtra Election Result 2019 Live : सांगलीत कोणाची होणार सरशी?

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार की प्रथमच कमळ फुलणार

First published: October 24, 2019, 9:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading