'फक्त काही तास बाकी, वादळापूर्वीची शांतता'; नितेश राणेंच्या ट्वीटमुळे राजकारणात खळबळ

'फक्त काही तास बाकी, वादळापूर्वीची शांतता'; नितेश राणेंच्या ट्वीटमुळे राजकारणात खळबळ

भाजपमध्ये प्रवेश न करताच नितेश राणे यांचं नाव थेट उमेदवारी यादी दिसणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

  • Share this:

कणकवली (सिंधुदूर्ग), 02 ऑक्टोबर : नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांना भाजपमध्ये प्रवेश न करताच एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 4 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नितेश राणे एबी फॉर्म भरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपमध्ये प्रवेश न करताच नितेश राणे यांचं नाव थेट उमेदवारी यादी दिसणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मंगळावारी रात्री नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा निर्णय झाला असल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, 'फक्त काही तास बाकी, वादळा पूर्वीची शांतता' असं सूचक ट्वीट नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलं आहे.

नितेश राणे हे कणकवलीमधून उमेदवारी अर्ज भरणार आहे. गेल्या दोन दिवसांआधी काँग्रेसमध्ये असलेल्या नितेश यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि आता ते थेट भाजपमधून विधानसभा निवडणूक लढणार आहे. खरंतर  नारायण राणेंच्या पक्ष प्रवेशाच्या तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे. त्यामुळं नेमकं राणे कधी भाजपवासी होत आहे की स्वाभिमानी हाच त्यांचा बाणा आणि पक्ष ठरणार का? हे येणारा काळच सांगेल.

"मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार...पक्षही विलीन करणार..." स्वत:हून ही घोषणा करणाऱ्या नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला काही केल्या मुहूर्त सापडत नाही आहे. 2 ऑक्टोबरला राणे पक्षात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. पण या दिवसाचाही भाजप प्रवेश लांबणीवर पडणार असल्याचं समोर आलं आहे. हा क्रम आता नित्याचा झालाय. राजकीय कारकीर्द जिवंत ठेवण्यासाठी राणेंना भाजपवाचून पर्याय नाही. पण सध्या भाजप आणि सेनेचं सूत जुळल्यामुळे राणेंना पक्षात घ्यायची भाजपला जराही घाई नाही. परिणामी आगामी निवडणुकीत राणे परिवार निष्प्रभ होईल की काय?, अशी दाट शक्यता असतानाच आता नितेश राणे भाजपमधून निवडणूक लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

लढत विधानसभेची : कणकवलीचा गड नितेश राणे राखणार का?

सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे असं एक समीकरणच कोकणच्या राजकारणात झालं होतं. 34 वर्षं शिवसेनेत राहिलेल्या आणि मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, मंत्री अशी महत्त्वाची पदं मिळालेल्या नारायण राणेंनी 2005 साली शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत राणेंनी शिवसेनेच्या परशुराम उपरकरांचं डिपॉझिट जप्त करुन दाखवलं.

इतर बातम्या - गणेश नाईकांबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्य, भाजप मंत्र्यांचं मोठं विधान

त्यानंतर 2009 च्या निवडणुकांआधी मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि राणेंचा मालवण कणकवली मतदार संघ विभागला जाऊन कणकवली देवगड वैभववाडी या तीन तालुक्यांचा एक मतदारसंघ झाला . कणकवलीच्या जागी मालवणला कुडाळ तालुका जोडला गेला आणि मालवण कुडाळ तालुक्यांचा दुसरा मतदारसंघ तर सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले तालुक्यांचा तिसरा विधानसभा मतदारसंघ झाला .

बदललेल्या कणकवली मतदारसंघात राणेंनी आपल्या जागी त्यांचे मुंबईतले समर्थक रवी फाटक यांना काँग्रेसकडून मैदानात उतरवलं आणि स्वत: मालवण कुडाळ मतदारसंघ निवडला. याच काळात राणेंबद्दल सिंधुदुर्गात नाराजीचं वातावरण वाढू लागलं. फाटक याना राणेंनी तिकीट मिळवून दिल्यामुळे राणेंचे कट्टर समर्थकही दुखावले गेले.

इतर बातम्या - 'होय, आमच्या बाबत घेवाण कमी आणि देवाणच जास्त झाली'

2009 मध्ये पराभव

याचा परिणाम म्हणून राणेंनी पूर्ण ताकद लावलेली असतानाही 2009 च्या अत्यंत अटीतटीच्या विधानसभा लढतीत राणेसमर्थक रवी फाटक यांचा भाजपाच्या प्रमोद जठारानी अवघ्या 34 मतानी पराभव केला आणि राणेंच्या बालेकिल्ल्याला पहिला सुरुंग लावला. तरीही राणे सत्ताधारी पक्षातले मंत्री असल्यामुळे सिंधुदुर्गच्या राजकारणावर नारायण राणेंचाच प्रभाव कायम होता .

2009 नंतरच्या पाच वर्षांत नारायण राणेंचा सिंधुदुर्गवरचा प्रभाव आणखी कमी झाला. आणि मालवणच्या पोटनिवडणुकीत अख्ख्या शिवसेनेला टक्कर देत परशुराम उपरकरांचं डिपॉझिट जप्त करुन दाखवणारे नारायण राणे 2014 साली मात्र मालवण कुडाळ मतदारसंघात शिवसेनेच्याच वैभव नाईकांकडून तब्बल 10 हजार मतांनी पराभूत झाले.

इतर बातम्या - शेवटच्या क्षणी गेम पलटला, दिल्लीतून गणेश नाईकांना मोठा धक्का!

राणेंना हा त्यांच्याच जिल्ह्यात झालेला पराभव अत्यंत जिव्हारी लागला. राणेंचा पराभव झाला तरी त्यांचा मुलगा नितेश राणेंनी मात्र काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि फाटकांना 34 मतांनी हरवणाऱ्या भाजपाच्या प्रमोद जठारांना तब्बल 25 हजार मतांनी हरवून कणकवली पुन्हा काबीज केली. त्यावेळी आपला जरी अस्त झाला असला तरी नितेश राणेचा उदय झाला आहे असं सूचक वक्तव्य नारायण राणे यानी केलं होतं.

 

Published by: Renuka Dhaybar
First published: October 2, 2019, 8:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading