शरद पवारांची घोषणा, साताऱ्यामध्ये जाऊन जनतेचे आभार मानणार!

'मी उद्या इतर दौरे रद्द करून साताऱ्याला जाऊन राष्ट्रवादीचे उमेदवार आणि जनतेचं आभार मानणार आहे,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 01:54 PM IST

शरद पवारांची घोषणा, साताऱ्यामध्ये जाऊन जनतेचे आभार मानणार!

मुंबई, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीचे कल आणि निकाल समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'सातारा गादीबद्दल जनतेला आदर आहे. पण उदयनराजे भोसले यांनी गादीची प्रतिष्ठा राखली नाही. मी उद्या इतर दौरे रद्द करून साताऱ्याला जाऊन राष्ट्रवादीचे उमेदवार आणि जनतेचं आभार मानणार आहे,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नवी पिढी राज्यात राजकारणात आम्ही उभी करणार आहोत. मी स्वत: उद्यापासून युवा नेतृत्वासाठी राज्यभर फिरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक दिवाळी झाल्यावर होईल. पुढच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मित्र पक्षांचीही बैठक होईल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

- पक्षांतर करणाऱ्या लोकांना जनतेने स्वीकारले नाही

- सत्तेचा उन्माद लोकांना पसंत पडत नाही

Loading...

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महायुतीने 162 जागांवर आघाडी घेतली होती. महाआघाडीने 97 जागांवर आघाडी घेत गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जोरदार कमबॅक केले आहे. निवडणुकीत वंचित आणि मनसे यांचा फार प्रभाव दिसल्याचे दिसला नाही.

LIVE VIDEO : धनंजय मुंडे झाले भावुक, कार्यकर्तेही जल्लोष करत रडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 01:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...