महाराष्ट्राच्या निवडणुकीत कुणाला काय मिळालं? कुणी काय गमावलं? वाचा निकालाचं समग्र चित्र

महाराष्ट्राच्या निवडणुकीत कुणाला काय मिळालं? कुणी काय गमावलं? वाचा निकालाचं समग्र चित्र

राज्यात भाजप - शिवसेना महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट आहे पण भाजप आणि शिवसेनेत सरकार स्थापनेमध्ये बऱ्याच वाटाघाटी होणार असं दिसतंय. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला 50- 50 फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. सत्तेत समान वाटा हवा, असाच सेनेचा आग्रह आहे. आता शिवसेनेचा फॉर्म्युला भाजप स्वीकारणार का ते पाहावं लागेल.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. भाजप - शिवसेना महायुतीला 161 जागा मिळाल्या तर काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला 104 जागा मिळाल्या. वंचित बहुजन आघाडीला 2 जागा तर मनसेला 1 जागा मिळाली. इतर विजयी उमेदवारांची संख्या 20 आहे.

'आमचं ठरलंय'खरं होणार का?

हा निकाल पाहिला तर राज्यात भाजप - शिवसेना महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट आहे पण भाजप आणि शिवसेनेत सरकार स्थापनेमध्ये बऱ्याच वाटाघाटी होणार असं चित्र आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला 50- 50 फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे. सत्तेत समान वाटा हवा, असाच सेनेचा आग्रह आहे. आता शिवसेनेचा फॉर्म्युला भाजप स्वीकारणार का ते पाहावं लागेल.

भाजपला 103 जागा मिळाल्या तर शिवसेनेला 57 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 44 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागांवर विजय मिळवला. वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि MIM या पक्षांनीही या निवडणुकीत खातं उघडलं आहे. वंचित बहुजन आघाडीला 2, MIM ला 2 आणि मनसेला 1 जागा मिळाली.

(हेही वाचा : मुख्यमंत्रिपदावर आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया)

भाजपला बंडखोरीचा फटका

महाराष्ट्रासोबतच हरियाणा विधानसभेचा निकाल पाहता दोन्ही राज्यांत सत्तास्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्रात भाजपला बंडखोरीचा फटका बसला पण 15 बंडखोर आपल्या संपर्कात आहेत आणि ते महायुतीत येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

खरा पैलवान कोण?

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मात्र बाजीगर ठरले, असाच सगळ्यांचा सूर आहे. शरद पवारांनी शेवटपर्यंत लढत दिली आणि राष्ट्रवादीला चांगलं यश मिळवून दिलं.सातारा लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीने हा बालेकिल्ला राखला आणि भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंना हार पत्करावी लागली.

आयारामांना दणका

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण भाजप - शिवसेनेत गेले पण त्यांना म्हणावं तसं यश आलं नाही. त्याचबरोबर काही ठिकाणी 'नोटा' चा प्रभावही जाणवला. एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजांना कलाटणी देणाऱ्या या निकालांबद्दल सविस्तर बघुया.

(हेही वाचा : ‘लेक निघाली सासरला’, पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल)

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा - 288

मुंबई, ठाणे, पालघर - 60 जागा

भाजप - 21

शिवसेना - 21

काँग्रेस - 4

राष्ट्रवादी काँग्रेस - 8

मनसे - 1

इतर - 5

मराठवाडा - 46 जागा

भाजप - 10

शिवसेना - 18

काँग्रेस - 8

राष्ट्रवादी - 10

विदर्भ - 62 जागा

भाजप - 30

शिवसेना - 5

काँग्रेस - 16

राष्ट्रवादी - 7

इतर - 4

(हेही वाचा : निकालानंतर पश्चिम महाराष्ट्रात उद्यापासून पावसाचा धुमाकूळ, अतिवृष्टीचा इशारा)

उत्तर महाराष्ट्र - 35 जागा

भाजप - 17

शिवसेना - 1

काँग्रेस - 9

राष्ट्रवादी - 6

इतर - 2

कोकण - 15 जागा

भाजप - 2

शिवसेना - 8

काँग्रेस - 1

राष्ट्रवादी - 3

इतर - 1

(हेही वाचा : 15 बंडखोरांशी बोलणं झालंय, त्यांचा भाजपला पाठिंबा- मुख्यमंत्री)

पश्चिम महाराष्ट्र - 70

भाजप - 22

शिवसेना - 6

काँग्रेस - 13

राष्ट्रवादी - 21

इतर - 8

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 07:42 PM IST

ताज्या बातम्या