'कृष्णाच्या मदतीने 'द्रौपदी' आमदार', भाजप उमेदवाराला केलं पराभूत

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल करून गीता जैन यांनी विजयही मिळवला.

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2019 02:47 PM IST

'कृष्णाच्या मदतीने 'द्रौपदी' आमदार', भाजप उमेदवाराला केलं पराभूत

मुंबई, 26 ऑक्टोबर : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 105 जागा जिंकल्या. त्याखालोखाल सेनेने 56, राष्ट्रवादीने 54 काँग्रेसनं 44 जागा जिंकल्या. तर 28 जागा अपक्ष आणि इतर पक्षातील उमेदवारांनी जिंकल्या. राज्यात भाजपने निवडणुकी आधी इतर पक्षातून आयात केलेल्या उमेदवारांमुळे काहींनी बंडखोरी केली. अशा बंडखोर उमेदवारांचा काही ठिकाणी विजयसुद्धा झाला आहे.

मीरा भाईंदर मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवलेल्या गीता जैन या भाजपच्या बंडखोर होत्या. त्यांनी भाजपच्याच उमेदवाराला 15 हजारांनी पराभूत केलं. भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्याविरुद्ध गीता जैन यांनी विजय मिळवल्यानं पक्षाला धक्का बसल्याचे मानले जात आहे. स्थानिक पातळीवरील नेते गीता जैन यांचे समर्थन करत असताना भाजपने आमदार नरेंद्र मेहतांना पुन्हा तिकिट दिले होते.

निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजपविरुद्ध जिंकल्यानंतर गीता जैन म्हणाल्या की, लोकांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. तसेच त्यांनी महाभारताचा दाखला देत सांगितलं की, या युद्धात मी एकटी द्रौपदी नव्हते तर या परिसरातील लोकही होते ज्यांना सरकारचा त्रास झाला. या त्रासातून मला वाचवण्यासाठी माझे समर्थक कृष्ण झाले असंही त्यांनी म्हटलं. मतदानानंतर गीता यांनी सर्वांचे आभार मानतानासुद्धा अशाच भावना व्यक्त केल्या.

भाजपने गीता जैन यांना उमेदवारी नाकारल्यानंतर स्थानिक नेत्यांनी पाठिंबा दिला. स्थानिक मुद्यांना हात घालत गीता जैन यांनी लोकांना साद घातली होती. गीता जैन या मीरा भाईंदरमधून निवडून येणारी पहिली महिला आमदार ठरल्या आहेत. तसेच विजयानंतर आपण कमळाविरुद्ध नाही तर त्याच्याभोवतीने साचलेल्या दलदलीविरुद्ध आहे असं म्हणत भाजपशी नातं तोडलं नसल्याचं सूचक वक्तव्य केलं.

Loading...

SPECIAL REPORT: सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या 'या' नेत्यांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 01:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...