विधानसभा निवडणुकीतल्या जागावाटपावरून आघाडीत 'बिघाडी'

विधानसभा निवडणुकीतल्या जागावाटपावरून  आघाडीत 'बिघाडी'

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतरही दोन्ही पक्ष काहीच धडा शिकले नाहीत असंच म्हटलं जातंय.

  • Share this:

मुंबई 13 जून : विधानसभा निवडणुकीला आता फक्त काही महिने शिल्लक आहेत. युतीचं जागावाटप पूर्णही झालंय. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचं जागावाटपासाठी चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. या चर्चेत मुंबईतल्या जागांववरून दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेद झाल्याची माहिती पुढे येतेय. मुंबईतलं जागावाटप समसमान पातळीवर व्हावं असं राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहीर यांनी म्हटलंय. तर राष्ट्रवादीची मुंबईत ताकदच नाही तर अर्ध्या जागा द्यायच्या कशा असा सवाल काँग्रेसने केलाय.

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतरही दोन्ही पक्ष काहीच धडा शिकले नाहीत असंच म्हटलं जातंय. भाजप आणि सेनेसारख्या मजबूत पक्षांशी मुकाबला करण्यासाठी एकत्र येवून लढू अशी घोषणा दोन्ही पक्षांनी केला. मात्र जागावाटपाच्या चर्चेत घोळ घातला जातोय अशी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची तक्रार आहे. या चर्चेत वेळ जातो आणि मग तयारीसाठी जास्त दिवस मिळत नाही असं या नेत्यांचं म्हणणं आहे.

या चर्चेवर काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह म्हणाले, एनसीपीने काय प्रस्ताव नेमका मांडला हे माहित नाही, काँग्रेस पक्षांची मुंबई क्षेत्रातील विधानसभा आढावा बैठक शुक्रवारी आहे. त्यावेळी चर्चा करू, काँग्रेस पक्षश्रेष्ठी या प्रश्नावर अंतिम निर्णय घेतील. 2009  मध्ये विधानसभा निवडणुकीत 37 पैकी 7 जागा काँग्रेस राष्ट्रवादीला दिल्या होत्या.

अंतिम जागा वाटप  एनसीपी आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी करतील असं म्हटलं जात असलं तरी राष्ट्रवादीला अर्ध्या जागा द्यायला मात्र काँग्रेसची सकारात्मक भूमिका नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

First published: June 13, 2019, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading